Tarun Bharat

सिंधुदुर्गातील आणखी 15 एसटी कर्मचाऱयांचे निलंबन

प्रतिनिधी / कणकवली:

रा. प. महामंडळाच्या कर्मचाऱयांनी शासन सेवेत विलिनीकरणासाठी सुरू केलेले कामबंद आंदोलन गुरुवारी अकराव्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील आणखी 15 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. त्यामुळे निलंबित कर्मचाऱयांची संख्या 32 झाली आहे.

बुधवारी रोजंदारीवरील कर्मचाऱयांना कामावर हजर होण्यासाठी नोटीस देण्यात आलेली होती. हजर न झाल्यास सेवामुक्ती करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, याप्रकरणी उशिरापर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आलेली नव्हती. दुसरीकडे कामावर हजर न झाल्याप्रकरणी विभागीय कार्यशाळेतील आठ, सावंतवाडी आगारातील सहा व कुडाळ आगारातील आणखी एक अशा 15 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग विभागातून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱयांची संख्या आता 32 झाली आहे.

दरम्यान, गुरुवारी अकराव्या दिवशीही सिंधुदुर्ग विभागातील एसटी वाहतूक 100 टक्के बंद राहिली होती. तसेच कामगार हजर न झाल्यास कारवाईची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Related Stories

म्युकरमायकोसीसचा जिल्हय़ात तिसरा बळी

Patil_p

एसटी प्रवासी संख्या 16 हजाराच्या पार

Patil_p

आठही तालुक्यांत कोविड केअर सेंटर

NIKHIL_N

गणपतीपुळेतील वॉटर स्पोर्ट व्यवसायावर टांगती तलवार

Archana Banage

प्राथमिक शिक्षकांना प्रंटलाईन वर्करमधून लसीकरण

NIKHIL_N

कोनाळकट्टा हायस्कूलच्या दहा विद्यार्थिनींना करण्यात आले सायकल वाटप

NIKHIL_N