Tarun Bharat

सिंधुदुर्गात एसटीचे 137 कर्मचारी कामावर

प्रतिनिधी / कणकवली:

रा. प. कर्मचाऱयांनी शासन सेवेत विलिनीकरणासाठी सुरू केलेला संप सिंधुदुर्गमध्ये सलग नवव्या दिवशी सुरू होता. नवव्या दिवशीही जिल्हय़ातील 100 टक्के वाहतूक बंद राहिली. दरम्यान, मंगळवारी एकूण 137 कर्मचारी कामावर हजर झाले होते.

मंगळवारी हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 87 प्रशासकीय, 38 कार्यशाळा, 5 चालक, एक निलंबित वाहक तसेच सहा चालक कम वाहक मंगळवारी कामावर हजर झाले असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, मंगळवारीही कामगार संपावर ठाम असल्याने जिल्हय़ातील एसटी वाहतूक पूर्णत: ठप्प झालेली होती. यामुळे ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी येणाऱया सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत असल्याचे दिसत आहे. मात्र, संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने अजून किती दिवस संप सुरू राहणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Stories

ग्रामस्थांचा विरोध डावलून जामदा धरणाचे काम सुरू

Patil_p

वायरीत मालवण पोलिसांवर हल्ला

NIKHIL_N

धोपेश्वर खंडेवाडी येथे रिक्षा व तीन दुचाकी आगीत जळून खाक

Archana Banage

आंग्रिया बँक भारतातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र

NIKHIL_N

काजू खरेदीसाठी प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर करावी!

NIKHIL_N

रत्नागिरी : अंजनवेल समुद्रामध्ये मच्छिमार बोटीला जलसमाधी

Archana Banage