Tarun Bharat

सिंधुदुर्गात ज्येष्ठ नागरिकांचे प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Advertisements

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने दिलेल्या विविध सुविधांकडे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले. यासंदर्भात जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शासन सुविधांपासून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना वंचित ठेवल्यामुळे 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांच्या उपक्रमासाठीही शासनाने निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकृत निर्णय जाहीर केला.मात्र जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेवेळी केला. चर्चेत कुडतरकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मनोहर आंबेकर, शैलेजा चुबे,श्री कोचरेकर, चंद्रकांत अणावकर, श्री कोरगावकर, रवींद्र मुसळे, भालचंद्र मेस्त्री आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने म्हटले आहे १ व ६ मार्च 2019 तसेच 11 जून 2019 अशी मागणीची तीन वेळा निवेदने देण्यात आली. पण एकाही निवेदनाची आतापर्यंत दखल घेण्यात आलेली नाही.त्यामुळे 26 जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा निर्णय नाविलाजास्‍तव घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी शासनाच्या वीस विभागाला आदेशित केले आहे. मात्र अठरा महिने संपत आले तरी एकाही विभागाने त्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर केलेली ही योजना शासनाच्या केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आहे असे दिसून येत आहे.

शासकीय व जिल्हा परिषद आणि नगरपरिषद या विभागातील संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी तीन पत्रे देऊन चर्चेसाठी भेटीची तारीख व वेळ मागितली होती.मात्र फारशी दखल घेतलेली नाही. निवृत्त झालेले हजारो प्राथमिक शिक्षक कर्मचारी संबंधित विभाग कार्यपद्धतीमुळे त्यांच्या सेवा काळातील देय असलेल्या आर्थिक लाभापासून ते वर्षानुवर्षे वंचित आहेत. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना देऊ केलेले लाभ त्यांना सन्मानाने देण्याबाबत प्रशासन जर सकारात्मक प्रतिसाद देणार नसेल तर रस्त्यावर येऊन सनदशीर मार्गाने आमची वेदना आणि होणाऱ्या अन्यायाविरोधात लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Related Stories

अलगीकरण कक्षातील 17 वर्षीय मुलाचे पलायन

NIKHIL_N

गोळवण कृषी सहाय्यकाची आत्महत्या

NIKHIL_N

समुद्रात उडी घेतल्याने पर्यटक गंभीर जखमी

NIKHIL_N

शाळा प्रवेशासाठीची वयोमर्यादा निश्चित

NIKHIL_N

ग्रंथालयांचे थकित 31 कोटी अनुदान मंजूर!

NIKHIL_N

कणकवलीत दुचाकींची सीमेवरच चौकशी

NIKHIL_N
error: Content is protected !!