प्रतिनिधी / मालवण
रविवार असल्याने आज मालवण चिकन मार्केटमध्ये चिकन खरेदी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. चिकन आणि मटन मार्केट एकत्रित असल्याने दुचाकी वाहने आणि नागरिकांची गर्दी यामुळे मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडालेला दिसून येत होता. मार्केटमधील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने दुकानदारांवर थेट कारवाई केली.
मालवण नगरपालिकेच्यावतीने चिकन आणि मटण मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंग बोजवारा उडाल्याने दहा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार दंडात्मक कारवाई करू नये दुकानदारांकडून सोशल डिस्टंसिंग न पाळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक विजय खरात, मुकादम रमेश कोकरे यांच्या पथकाने केली. या कारवाईतून दहा जणांना कडून 2500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला