Tarun Bharat

सिकेटी फुटबॉल मैदानाचे आज होणार उद्घाटन;5 कोटींचा प्रकल्प

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

नावेली-सिकेटीतील अद्ययावत फुटबॉल मैदानाचे उद्घाटन आज 25 जून रोजी होणार आहे. सायंकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करतील. या मैदानामुळे नावेली मतदारसंघातील युवा फुटबॉलपटूंची कैक वर्षांची मागणी आता पूर्ण झाली आहे.

गोवा विकास साधनसुविधा महामंडळाने या फुटबॉल स्टेडियमची निर्मिती केली असून यास सुमारे 5 कोटीचा खर्च आला आहे. आज होणाऱया उद्घाटनाला नावेलीची आमदार लुईझिन फालेरो, जीएसआयडीसीचे उप-चेअरमन आणि म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा, नावेलीच्या सरपंच बेबिंदा गोन्साल्वीस, उपसरपंच आदेलिना फर्नांडिस तसेच पंच सदस्य लिना रिबेलो, वॅलिंदा डायस, आंजेला बार्रेटो, आयडा कार्दोझ, इस्मेराल्डिना कुयेल्हो, विल्मा डिसिल्वा, मिंगेल कार्दोझ आणि एल्ड्रिच कुयेल्हो यांची उपस्थिती असेल.

सिकेटी मैदान टर्फ ग्रासचे असून यावर पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 1000 प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी बसण्याचीही सोय या मैदानावर असून भविष्यात बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल कोर्टही बनविण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे.

मैदानावर दोन्ही संघांसाठी रूम्स तसेच कार्यालय, स्टोअर रूम, जिम आणि प्रेक्षकांसाठी स्वच्छतागृहांचीही सोय आहे. पहिल्या मजल्यावर 500 लोक सामवून घेणारे मल्टिपपर्झ हॉल, 30,000 लीटरची अंडरग्राऊंड पाण्याची टाकी, दुचाकी तसेच चार चाकी गाडय़ांसाठी पार्पिंग व्यवस्थाही या मैदानावर करण्यात आली आहे. याशिवाय प्रकाशझोतात सामन्यांसाठी सराव करण्याची व्यवस्थाही या मैदानावर करण्यात आली आहे.

Related Stories

साटरे येथील डोंगराचे भूस्खलन

Omkar B

केपे पालिकेत आणखी 6 अर्ज दाखल

Amit Kulkarni

धावत्या ट्रकला आग लागून ट्रक खाक

Amit Kulkarni

गोव्यात कोळसा ‘हब’ होऊ दिला जाणार नाही

Patil_p

शरद पवारांचे दाबोळी विमानतळावर स्वागत

Amit Kulkarni

भाजपकडून अल्पसंख्याववर अन्याय : काँग्रेस

Amit Kulkarni
error: Content is protected !!