Tarun Bharat

सिग्नेचर इलेव्हन, युनियन जिमखाना संघ विजयी

युनियन जिमखाना आयोजित माळमारूती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा : मनोज पाटील, रोहित देसाई सामनावीर पुरस्काराचे मानकरी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित माळमारूती चषक चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिग्नेचर संघाने ऍडक्होकेट संघाचा चार गडय़ांनी तर युनियन जिमखाना संघाने युनायटेड बालाजी संघाचा 112 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. मनोज पाटील (सिग्नेचर), रोहित देसाई (जिमखाना) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऍडव्होकेट संघाने 20 षटकात 8 बाद 134 धावा केल्या. विशाल गौरगोंडाने 1 षटकार, 3 चौकारासह 36, बसवराज जरळीने 4 चौकारासह 31, तर सलमानने 1 षटकार, 2 चौकारासह 24 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे मनोज पाटीलने 12 धावात 4 तर प्रसाद नाकाडीने 26 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर संघाने 18.5 षटकात 6 बाद 137 धावा करून सामना चार गडय़ांनी जिंकला. मनोज पाटीलने 4 षटकार, 5 चौकारासह 26 चेंडूत 56, प्रसाद नाकाडी व सचिन शिंदे यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. ऍडक्होकेटतर्फे सुनील सक्रीने 30 धावात 2 तर विशाल गौरगोंडाने 27 धावात 2 गडी बाद केले.

 दुसऱया सामन्यात युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 5 बाद 209 धावा केल्या. रोहित देसाईने 5 षटकार, 9 चौकारासह 50 चेंडूत 86, आशिष मंडोळकरने 5 चौकारासह 37, राहुल नाईकने 4 षटकार, 3 चौकारासह 20 चेंडूत 44 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे ओमकार व जावेद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी संघाचा डाव 16 षटकात सर्व बाद 97 धावात आटोपला. रवी जयरामने 23, शिवम यादवने 17, तर आक्षित मुदलीयारने 14 धावा केल्या.

 जिमखानातर्फे संकेत देसाईने 25 धावात 4, मिलिंद चव्हाणने 22 धावात 3 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे एन. बी. पाटील, आनंद कोला यांच्या हस्ते सामनावीर मनोज पाटील व इम्पॅक्ट खेळाडू प्रसाद नाकाडी यांना चषक देवून तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे जोतिबा गिलबिले व हसन गोकाक यांच्या हस्ते सामनावीर रोहित देसाई व इम्पॅक्ट खेळाडू किरण तारळेकर यांना चषक देवून गौरविण्यात आले.

Related Stories

ज्येष्ट नागरिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

काम अर्धवट तरी अधिकारी गप्प का?

Amit Kulkarni

केएलई चॅरिटेबल-हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रथमोपचार कार्यशाळा

Amit Kulkarni

आंबेवाडी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Patil_p

शिवसैनिकांची कोगनोळीनजीक पुन्हा अडवणूक

Amit Kulkarni

करडीगुद्दीजवळील तलवार हल्ला क्षुल्लक कारणावरून

Amit Kulkarni