Tarun Bharat

सिग्नेचर क्लब, सीसीआय ब संघ विजयी

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

नारी शक्ती आणि सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब आयोजित नरेंद्र कुलकर्णी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब संघाने ऍडक्होकेट इलेव्हनचा 7 गडय़ानी तर सीसीआय ब ने चॅलेंजर स्पोर्ट्सचा 71 धावानी पराभव केला. आनंद कुंभार (सिग्नेचर), केसर तंत्री यांना सामनावीर पुरस्करार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धेत सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऍडव्होकेट इलेव्हनने 20 षटकात 6 गडी बाद 136 धावा केल्या. त्यात कपिल वाळवेकरने 6 चौकारासह 34 तर सुनील सक्रीने 4 चौकारासह 32 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे अमोल यल्लुप्पाचेने 23 धावात 3 तर आनंद कुंभारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर संघाने 15.1 षटकात 3 गडी बाद 140 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला.

त्यात संतोष चव्हाणने 4 षटकार, 7 चौकारासह 58, आनंद कुंभारने 5 चौकारासह 41 धावा केल्या. ऍडव्होकेटतर्फे सुनील सक्रीने 37 धावात 2 गडी बाद केले.

दुसऱया सामन्यात सीसीआय ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 183 धावा केल्या. त्यात केसर तंत्रीने 35 चेंडूत 38 तर सत्यजित पाटीलने 1 षटकार, 4 चौकारासह 34 धावा केल्या.

चॅलेंजर संघातर्फे राजू करोसीने 27 धावात 4 तर विनायक कांबळेने 19 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल चॅलेंजर संघाने 20 षटकात 8 बाद 112 धावाच केल्या. त्यात राजू तेवरने 4 चौकारासह 25 तर राजू सानीने 17 धावा केल्या. सीसीआयतर्फे गौरव थोरातने 20 धावात 2 गडी बाद केले.

Related Stories

‘गुरुदत्त’तर्फे कोरोना लसीकरणासाठी मदत

Patil_p

पोलीस कर्मचाऱयांतर्फे पोलीस हुतात्मा दिन साजरा

Patil_p

भटकळ तालुक्यात पावसाचा हाहाकार

Amit Kulkarni

उद्योग खात्रीतील कामांना चालना

Amit Kulkarni

गुरुवारी जिल्हय़ात कोरोनाचे 49 नवे रुग्ण

Amit Kulkarni

सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

Omkar B
error: Content is protected !!