अत्याधुनिक कार्सचे उत्पादन करणाऱया जागतिक किर्तीच्या कंपन्या एफसीए व पीएसए यांच्या विलीनीकरणातून तयार झालेली सिट्रोन या कंपनीने दिल्लीतील आपल्या उत्पादन केंद्रात सी-5 या ख्यातनाम कारच्या उत्पादनाला प्रारंभ केला आहे. या कार्स लवकरच भारतीयांना सेवेत उपस्थित होणार आहेत. सिट्रोन ब्रँडचे हे भारतातील प्रथमच उत्पादन आहे. याचे लाँचिंग 2021 च्या पहिल्या तिमाहीतच केले जाईल. ही अतिशय दणकट कार असून पहिल्या कारचे सध्या परीक्षण सुरू आहे. विविध प्रकारच्या रस्त्यांवरून तसेच विविध हवामानांच्या प्रदेशात या कारला अडीच लाख किलोमीटर पळवले जाईल. त्यानंतर तिची स्थिती तपासली जाईल. अशा अत्यंत कठोर परीक्षणानंतरच ती ग्राहकांच्या सेवेसाठी बाजारात उतरवली जाईल. ही कार डिझेलवर चालणार असून इंजिनाची क्षमता 2.0 लिटर आहे. 8 स्प्पीड ऍटोमॅटिक ट्रन्समिशन विथ शिफ्ट अँड पार्क वायर कंट्रोल हे तिचे आणखी एक वैशिष्टय़ असेल. ही कार भारतीय बाजारात मानाचे स्थान पटकावेल असा विश्वास सिट्रोनच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला.


previous post