Tarun Bharat

सिडनी लेव्हरोन, डुप्लांटीस वर्षातील सर्वोत्तम विश्व ऍथलिट्स

वृत्तसंस्था/ पॅरीस

अमेरिकेची विश्व चॅम्पियन महिला धावपटू सिडनी मॅक्लॉलिन लेव्हरोन तसेच स्वीडनचा पोल व्हॉल्टर माँडो डुप्लांटीस यांची विश्व ऍथलेटिक्स संघटनेतर्फे 2022 च्या वर्षातील सर्वोत्तम विश्व ऍथलिटस् म्हणून निवड करण्यात आली. सोमवारी संघटनेतर्फे ही घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या सिडनी मॅक्लॉलिनने महिलांच्या 400 मी. हर्डल्समध्ये दोनवेळा विश्वविक्रम केला. तर स्वीडनचा पोल व्होल्टर डुप्लांटीस पोल व्हॉल्ट या क्रीडा प्रकारात तीन नवे विश्वविक्रम नोंदवले. अमेरिकेत जन्मलेला पण स्वीडनचे प्रतिनिधीत्व करणारा डुप्लांटीसने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत विश्व सर्वोत्तम ऍथलिटस्चा पुरस्कार दुसऱयांदा पटकावला आहे. गेल्या मार्चमध्ये त्याने पुरुषांच्या विश्व इनडोअर स्पर्धेत विजेतेपद तर गेल्या जुलैमध्ये त्याने विश्व आऊटडोअर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. या वर्षाच्या ऍथलेटिक्स हंगामामध्ये डुप्लांटीसने 19 पैकी 18 स्पर्धा जिंकल्या आहेत.

Related Stories

डॅरेल मिशेल, ब्लंडेलने न्यूझीलंडचा डाव सावरला

Patil_p

आयपीएलमधील कॅरेबियन खेळाडू मायदेशी परतले

Patil_p

न्यू इन क्लासिक चेस क्लासिकमध्ये कार्लसन विजेता

Patil_p

भारताच्या 345 धावांना न्यूझीलंडचे चोख प्रत्युत्तर

Patil_p

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम ; जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा!

Archana Banage

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी दिलीप तिर्की

Patil_p