Tarun Bharat

सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे राजकीय षडयंत्र : मंत्री श्रीरामुलू

बेंगळूर/प्रतिनिधी

भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह हे कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षातील नेत्यांची बैठक घेतली आहे. बैठकीनंतर मंत्री बी. श्रीरामुलू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी श्रीरामुलू यांनी अरुण सिंग यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस राजकीय षडयंत्र रचत आहे, कारण माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण त्याच्या मागे ‘कट्टप्पा’ आहे हे त्यांना माहित नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, अरुण सिंग यांनी याआधी मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा कायम राहतील असे म्हंटले होते. तसेच .एच. विश्वनाथ काय म्हणाले, ते त्यांच्या वैयक्तिक मत आहे, असे बी. श्रीरामुलू म्हणाले. दरम्यान भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंग यांनी सकाळी भाजप नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बेंगळूर येथील कुमार कृपा अतिथीगृहात दाखल होत मंत्र्यांची बैठक घेतली.

अरुण सिंग हे तीन दिवसांच्या राज्य दौर्‍यावर आहेत. तसेच अरुण सिंग हे पक्षांतर्गत सुरु असलेल्या कलहाविषयी विषयी माहिती घेतील. तसेच ते नाराज आमदार आणि मंत्री यांच्याशीही चर्चा करणार आहेत.

Related Stories

कर्नाटक: बारावीचा निकाल जाहीर; २,२३९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

Archana Banage

मंगळूर विमानतळावर ३०.७३ लाख रुपयांचे सोने जप्त

Archana Banage

जिलेटिनच्या भीषण स्फोटात पाच ठार

Amit Kulkarni

कर्नाटक: अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव घेण्यावरून सभागृहात गोंधळ

Archana Banage

बेंगळूर ‘लॉकडाऊन’बाबत आज निर्णय

Amit Kulkarni

कॉंग्रेसचे आमदार नारायण राव यांचे कोरोनाने निधन

Archana Banage