Tarun Bharat

सिद्धिविनायक फौंडेशनतर्फे सुवर्ण सिंहासनासाठी मदत

प्रतिनिधी/ बेळगाव

अनगोळ, लोहार गल्ली येथील श्री सिद्धिविनायक फौंडेशन तसेच अनगोळचे धारकरी व कार्यकर्ते सोमनाथ कलखांबकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने 5 हजार 555 रुपयांचा निधी श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थान यांच्याकडे सुपूर्द केला आहे. हा निधी 32 मण सुवर्णसिंहासाठी देण्यात आला आहे.

यावेळी फौंडेशनचे सदस्य भावेश ताशिलदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनासाठी कर्तव्य म्हणून आम्ही हा निधी देत आहे. अशा प्रकारे मोठय़ा प्रमाणात निधी जमा होत आहे. शिवप्रति÷ानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या उपक्रमास अनगोळ येथील धारकऱयांनीही खारीचा वाटा उचलला आहे.

यावेळी गल्लीतील नागरिक व फौंडेशनचे कार्यकर्ते आकाश सुणगार, संदेश कलखांबकर, सागर लोहार, सचिन आर. के., सोमनाथ कलखांबकर, शिवाजी पाटील, राजू बुध्याण्णावर, संतोष पुजारी, सुधीर भेंडीगेरी, प्रवीण टोणेण्णावर, रमेश कलखांबकर, प्रवीण लोहार तसेच गल्लीतील नागरिक उपस्थित होते. शिवप्रति÷ानचे विभाग प्रमुख महेश पाटील व मदन मुचंडी यांच्याकडे हा निधी देण्यात आला. यावेळी भावेश ताशिलदार यांनी आभार मानले.

Related Stories

विजेच्या धक्क्याने दोघा शेतकऱयांचा मृत्यू

Patil_p

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी झुंबड

Omkar B

गोवा एक्स्प्रेस धावणार लोंढय़ापर्यंतच

Patil_p

डॉ.सतीश याळगी यांचा सत्कार

Patil_p

तुरमुरी येथे खड्डय़ात पडून मुलीचा मृत्यू

Patil_p

शैक्षणिक संस्थांची घरपट्टी कमी करा

Patil_p