Tarun Bharat

सिद्धूंना थेट भिडणार नाहीत अमरिंदर

पतियाळा येथूचन निवडणूक लढविणार -400 वर्षे जुने संबंध तोडू शकत नाही

वृत्तसंस्था/ पतियाळा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात निवडणूक लढविणार नाहीत. पतियाळा येथूनच निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पतियाळा 400 वर्षांपासून आमच्या कुटुंबासोबत राहिले आहे. सिद्धूंकरता मी पतियाळा सोडणार नसल्याचे कॅप्टन म्हणाले.

सिद्धू यांना कुठल्याही स्थितीत निवडणुकीत जिंकू देणार नसल्याचे कॅप्टन यांनी यापूर्वी अनेकदा म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नवज्योत सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी कॅप्टन यांना पूर्व अमृतसर मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते.

पंजाब लोक काँग्रेस

कॅप्टन अमरिंदर सिंह पंजाब लोक काँग्रेस पक्षाद्वारे विधानसभा निवडणूक लढणार आहेत. कृषी कायदे मागे घेतल्यावर शेतकरी आंदोलन संपणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. अशा स्थितीत कॅप्टन हे भाजपसोबत आघाडी करू शकतात.

सिद्धूंविरोधात मजबूत उमेदवार

सिद्धू यांना 2022 मध्ये पंजाबची निवडणूक जिंकू देणार नसल्याचे कॅप्टन यांचे म्हणणे आहे. यामुळे कॅप्टन यांच्या पक्षाकडून आता सिद्धू यांच्या विरोधात मजबूत उमेदवार दिला जाणार आहे. कॅप्टन यांनी यापूर्वी अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. 2014 मध्ये कॅप्टन यांनी मोदी लाट असतानाही अमृतसर येथे भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांना पराभूत केले होते.

खासदार पत्नीची साथ

कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पतियाळाच्या काँग्रेस खासदार परनीत कौर यांचीही साथ मिळणार आहे. आपण कुटुंबासोबत  आहोत. कॅप्टन हे दिलेला शब्द पूर्ण करणारे व्यक्ती आहेत असे परनीत यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी परनीत या अमरिंदर यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसून आल्या होत्या.

Related Stories

नितीशकुमार यांचे राज्यपालांकडे त्यागपत्र

Omkar B

पाक सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणेचे परीक्षण

Patil_p

पंतप्रधान मोदी 8 रेल्वेंचा प्रारंभ करणार

Patil_p

मुंबई, दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यात विकेंड कर्फ्यू

Tousif Mujawar

29 नोव्हेंबरला संसदेवर ट्रक्टर मोर्चा

Patil_p

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

Patil_p