Tarun Bharat

सिनसिनॅटी स्पर्धेत व्हेरेव्ह, बार्टी विजेते

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी

रविवारी येथे झालेल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सिनसिनॅटी मास्टर्स पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्ह आणि ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीने अनुक्रमे पुरूष आणि महिला गटातील अजिंक्यपदे पटकाविली.

पुरूष एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने रशियाच्या आंद्रे रूबलेव्हचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये एकतर्फी पराभव करत एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेतील पाचवे जेतेपद पटकाविले. व्हेरेव्हने हा सामना आपल्या अचूक आणि वेगवान खेळाच्या जोरावर तासभराच्या कालावधीत जिंकला. अलिकडच्या कालावधीत व्हेरेव्हने सलग अकरा सामने ज्ंिकले असून रूबलेव्हवरील त्याचा हा पाचवा विजय आहे. व्हेरेव्हने अलिकडे टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीने स्वीसच्या नवोदित टिचमनचा 6-3, 6-1 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. बार्टीला या जेतेपदाबरोबरच विजेतेपदाचा चषक देण्यात आला. डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने सलग 83 व्या आठवडय़ात अग्रस्थान कायम राखले आहे. बार्टीचे वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील एकेरीतील हे 19 वे विजेतेपद आहे.

Related Stories

रिचर्ड कॅरपझला रोड रेसचे सुवर्ण

Patil_p

भारताला युवा बीच हँडबॉलचे रौप्यपदक

Patil_p

एटीपी चषक स्पर्धेत सर्बियाला कठीण ड्रॉ

Patil_p

हरभजन सिंगला कोरोनाची बाधा

Patil_p

माजी पाक कर्णधार इंझमाम-उल-हकवर अँजिओप्लॅस्टी

Patil_p

भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या

datta jadhav