Tarun Bharat

सिनेमागृहे, नाटय़गृहे प्रेक्षकांसाठी खुली होणार

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हय़ातील बंदिस्त सभागृहे, मोकळय़ा जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबर 2021 पासून परवानगी दिली आहे. कोव्हिड-19 च्या सर्व नियमांचे पालन करत सदर नाटय़गृहे, सिनेमागृहे आदी सुरू करण्याबाबत  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी आदेश जारी केला. त्यामुळे कलाकारांकडुन तसेच रसिकप्रेमींकडुन आनंद व्यक्त होत आहे.

 या निर्णयामुळे अनेक कलावंतांची होणारी उपासमार अखेरीस थांबणार आहे. विविध नियमावलींमध्ये सदर चित्रपटगृहे, नाटय़गृहे सुरू करण्यास परवाणगी देण्यात आली आहे. यामध्ये सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या प्रक्षकांना प्रवेश, बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असु नये, बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे, सोशियल डिस्टंसिंग, प्रेक्षकांना मास्कचा व सॅटेटायझरचा वापर तसेच वेळोवेळी सभागृहे र्निजंतुकीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 त्यातच शहरातील शाहू कलामंदिरचे तर नुकतेच नुतनीकरण करण्यात आले असुन आता नव्याने कोणता कार्यक्रम रसिकांना सादर करण्यात येईल याकडे अधिकाधीक रसिकांचे लक्ष लागले आहे. तसेच येत्या काही दिवसात दिवाळी हा सण असल्याने दिवाळी पहाटसारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ही या दरम्यान ठेवले जातत. मागील दोन वर्षी या कार्यक्रमांना मुकावे लागले होते पण यंदा मात्र हे कार्यक्रम सादर करता येणार आहेत.

Related Stories

महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

datta jadhav

टीईटी नापास शिक्षकांचे वेतन थांबणार

Patil_p

कास रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सोडलं मौन

Archana Banage

तपासापासून सातारा पोलीस अनभिज्ञ

datta jadhav

सातारा : रेशनिंग कार्डला आधार लिंक करण्याची मुदत वाढवून मिळावी; अन्यथा आंदोलन…

datta jadhav

सातारा : कास पठार वनसमितीच्या कर्मचाऱ्यांनी दिले जखमी भेकराला जीवदान

Archana Banage