ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनावर प्रभावी ठरलेल्या ‘रेमडेसिवीर’ या औषधाची प्रजातीय आवृत्ती सिप्लाने तयार केली आहे. ‘सिप्रीमी’ असे या औषधाला नाव देण्यात आले असून, त्याची एक कुपी 4 हजारात उपलब्ध करून दिली जाणार आहे. सिप्लाचे कार्यकारी उपाध्यक्ष निखिल चोप्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
चोप्रा म्हणाले, देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रेमडेसिवीर या औषधाच्या उत्पादनाला भारतातील सिप्ला आणि हेटेरो या दोन कंपन्यांना परवानगी मिळाली आहे. त्यानुसार सिप्लाने ‘सिप्रीमी’ या नावाने रेमडेसिवीर औषधाची प्रजातीय आवृत्ती तयार
केली आहे. केवळ चार हजार रुपयात या औषधाची 100 मी ग्रामची कुपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हेटरो या हैदराबादच्या कंपनीने त्यांच्या औषधाची किंमत कुपीमागे 5400 रुपये ठेवली आहे. पहिल्या महिन्यात 80 हजार कुपी उपलब्ध करून देण्याचा सिप्लाचा प्रयत्न आहे, असेही चोप्रा यांनी सांगितले.