Tarun Bharat

सिरमची कोव्हिशील्ड २५ डिसेंबरपासून उपलब्ध

पुणे / प्रतिनिधी

 कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन परिस्थितीतील वापराबाबत सिरम इन्स्टिटÎूट ऑफ इंडियाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. याबाबत सिरमने केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. याबाबत अदर पूनावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

 आपल्या ट्विटमध्ये आदर पूनावाला म्हणतात, तुम्हा सगळÎांना शब्द दिल्याप्रमाणे, 2020 साल संपण्याच्या आधीच सिरम इन्स्टिटÎूटने `कोव्हिशिल्ड’ या मेड-इन-इंडिया लशीच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगीचा अर्ज केला आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिटÎूटमध्ये लसनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिटÎूटला नुकतीच भेट देऊन या लशीचा आढावा घेतला होता. अमेरिकेची औषध निर्माण कंपनी `फायझर’नेही शनिवारी केंद्र सरकारकडे कोरोना लशीला आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी मान्यता द्या, अशी मागणी केली आहे.

 स्पुटनिक 5 ची दुसऱया टप्प्यातील चाचणी सुरू

 भारतात रशियाच्या स्पुटनिक-5 या लसीच्या दुसऱया टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. पुण्यातील नोबेल रुग्णालयात ही चाचणी करण्यात येत असून, 17 स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. गॅमेलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) हे संयुक्तरित्या स्पुटनिक-5 ही लस तयार करत आहेत.  `मानवी चाचणीदरम्यान 17 तंदुरुस्त स्वयंसेवकांना गेल्या तीन दिवसांत स्पुटनिक-5 या लसीचे डोस देण्यात आले आहेत. ही रोगप्रतिबंधक लस टोचण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. सर्व स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. या सर्वांना पुढील काही दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. प्रोटोकॉलनुसार, चाचणीसाठी स्वयंसेवकांनी निरोगी असले पाहिजे. याचे पालन करत या 17 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे,’ अशी माहिती नोबेल रुग्णालयाच्या क्लिनिकल रिसर्च विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. राऊत यांनी दिली.

Related Stories

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

Archana Banage

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Archana Banage

बापूंचा फोटो चलनी नोटांवरून काढून टाका- तुषार गांधी

Abhijeet Khandekar

शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

राज्यपाल कोश्यारी कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

Archana Banage

राज्यात थेट सरपंचपदासह १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

Archana Banage