Tarun Bharat

सिरमने जाहीर केली कोरोनावरील लसीची किंमत; बनवणार 10 कोटी डोस

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कोरोना प्रतिबंधक लसीचे 10 कोटी डोस 2021 च्या सुरुवातीपर्यंत तयार करणार आहे. या लसीची किंमत साधारणपणे 225 रुपये असेल, असे सिरम इन्स्टिट्यूटने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

ऑक्सफर्डच्या मदतीने सिरम इन्स्टिट्यूट कोरोना प्रतिबंधक लस तयार करत आहे. कमी राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोरोना लसीचे हे डोस पोहचविण्याचा सिरमचा प्रयत्न आहे. सिरम, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यासाठी एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लसीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. तो GAVI मार्फत सिरमला देण्यात येईल. 

कोरोनावरील लसीसाठी सिरम इन्स्टिट्युटने ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत करार केला आहे. या लसीची चाचणी यशस्वी झाली, तर सीरम इन्स्टिट्युटला लसीच्या उत्पादनासाठी हा निधी मिळणार आहे.

Related Stories

गहू 2 रुपये, तांदूळ 3 रुपये किलोने मिळणार

tarunbharat

पश्चिम बंगाल : कॅन्टोन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉकडाऊन

Rohan_P

हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

datta jadhav

43 हजार कोटींना विकले IPL मीडिया राईट्स

datta jadhav

पँगाँग सैन्यमाघार 20 दिवसात पूर्ण होणार

Amit Kulkarni

जम्मू लष्करी स्थानकाजवळ 2 अज्ञात ड्रोनचा वावर

datta jadhav
error: Content is protected !!