Tarun Bharat

सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी

महामार्ग प्रकल्पाशी संबंधित कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सिव्हिल इंजिनियरिंग कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना भविष्यात इंटर्नशिपसाठी त्रास सहन करावा लागणार नाही. राष्ट्रीय महामार्ग निर्मितीशी निगडित कंपन्या अशा विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रकल्पांमध्ये इंटर्नशिपची संधी देणार आहेत. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केला आहे. कंपन्यांना पुढील आर्थिक वर्षापासून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी रुजू करवून घ्यावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर उत्तम कामगिरी करणाऱया 20 टक्के विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये नोकरीही द्यावी लागणार आहे.

रस्ते परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार महामार्ग निर्मिती आणि सल्लागाराशी संबंधित कंपन्यांना सिव्हिल इंजिनियरिंगच्या बीटेक आणि एमटेक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी द्यावी लागणार आहे. कंपन्या प्रारंभी प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी सामावून घेतील. कालौघात ही संख्या वाढत जाणार आहे. त्यानंतर उत्तम कामगिरी करणाऱया 20 टक्के विद्यार्थ्यांना कंपन्या नोकरी देणार आहेत. यात  शासकीय तसेच खासगी इंजिनियरिंग कॉलेजचा देखील समावेश असणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे दुहेरी लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी वणवण भटकावे लागणार नाही. यातील काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करतेवेळीच नोकरी मिळणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी निगडित कंपन्यांना इंटर्नशिपच्या स्वरुपात इंजिनियर मिळणार आहेत. यामुळे महामार्ग प्रकल्प वेगाने पूर्ण करता येणार आहेत.

देशात सुमारे 5800 इंजिनियरिंग कॉलेज असून यातील 73 टक्के खासगी तर 23 टक्के सरकारी कॉलेज आहेत. तर उर्वरित पब्लिक प्रायव्हेट इंजिनियरिंग कॉलेज आहेत. सुमारे 5 लाख विद्यार्थी दरवर्षी सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत बाहेर पडतात. या सर्व विद्यार्थ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

Related Stories

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा

Archana Banage

डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण करणार!

Patil_p

गोडय़ा पाण्यातील सर्वात मोठा मासा

Patil_p

सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर; म्हणाले, मोदी आता तरी…

datta jadhav

पुलवामामध्ये एका पाकिस्तानी नागरिकासह जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

मातेच्या दुधासाठी मागणीचा महापूर

Patil_p