Tarun Bharat

‘सीआयएससीई’ बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर

Advertisements

दहावीचा 99.98 तर बारावीचा 99.76 टक्के

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (‘सीआयएससीई’)  दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल शनिवारी परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. ‘सीआयएससीई’च्या दहावीचा निकाल यंदा 99.98 टक्के इतका लागला आहे. तर बारावीचा निकाल 99.76 टक्के इतका लागला. आता निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. तसेच अंतर्गत मूल्यांकनावरून निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बोर्डाने नववी आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारावर निकाल जारी केला आहे. मूल्यांकनासाठी यंदा पर्यायी पद्धत वापरण्यात आली. लेखी परीक्षा घेतल्या नसल्याने उत्तरपत्रिका फेरतपासणीची सुविधा उपलब्ध असणार नाही.

Related Stories

व्हीनस विल्यम्स पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

देशात 24 तासात 6088 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

छत्तीसगड : दुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा कहर; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

ताज महाल परिसरात फडकवला भगवा; चौघांना अटक

Rohan_P

पंजाबमधील मतदानाची तारीख लांबणीवर टाकण्याची मागणी

Patil_p

5 राज्यांमध्ये निवडणुकांची तयारी सुरू

Patil_p
error: Content is protected !!