Tarun Bharat

सीआरपीएफच्या आणखी चार जवानांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या आणखी चार जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जवानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, या चारही जवानांचे नमुने तपासणी अहवाल पॉझिटिव आले आहेत. या जवानांवर उपचार सुरू आहेत तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. 


या नव्याने आढळलेल्या 4 जवानांमुळे दलातील एकूण बाधितांची संख्या 363 वर पोहोचली आहे. सध्या 141 जणांवर उपचार चालू आहेत. तर 220 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत दोन जवानांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

मृत्यूशी झुंज अपयशी

Amit Kulkarni

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा मुहूर्त ठरला

Archana Banage

वसगडेत कृष्णा कालव्याचे पाणी तुंबले

Archana Banage

हैदराबादसमोर पराभवाची श्रृंखला खंडित करण्याचे आव्हान

Patil_p

राज ठाकरे यांच्याविरूद्ध अजामीन पात्र वॉरंट जारी

Abhijeet Khandekar

मतदारांना लाच, खासदाराला शिक्षा

Patil_p