Tarun Bharat

सीईटी : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

16 जुलैपर्यंत तर शुल्क भरण्यासाठी 19 पर्यंत मुदत

प्रतिनिधी /बेंगळूर

व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सामान्य प्रवेश परीक्षेचा (सीईटी-2021) अर्ज भरण्यासाठीची मुदत 16 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुकूल होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.

सीईटीचा अर्ज दाखल करण्याबरोबरच शुल्क भरण्यासाठी याआधी असणारी मुदत आठवडय़ाने वाढविण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठी 16 जुलैपर्यंत तर परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी 19 जुलैपर्यंत मुदत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी http://kea.kar.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

केएसआरटीसीची १० सप्टेंबरपासून बेंगळूर ते पणजी नवीन सेवा

Archana Banage

कोडगू जिल्ह्यात पावसाची शक्यता

Archana Banage

राज्य सरकार महिन्याच्या अखेरीस पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा घेणार निर्णय

Archana Banage

कर्नाटकात सप्टेंबरमध्ये विक्रमी लसीकरण

Archana Banage

बेळगावसह चार जिल्हय़ांमधील सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल

Amit Kulkarni

नव्या विषाणूचा अभ्यास करण्यासाठी राज्यात ६ प्रयोगशाळा स्थापन करणार : आरोग्यमंत्री

Archana Banage