Tarun Bharat

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर ‘या’ कारणामुळे कोसळले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

तामिळनाडूतील कुन्नुर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात भारताचे सरलष्कर बिपिन रावत व पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा या दुर्घटेत मृत्यू झाला होता. हे हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. ८ डिसेंबर रोजी दुपारी १२.४५ च्या दरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या साठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल समोर आला आहे. ट्राईने हा अहवाल वायुसेना प्रमुखाला सोपवला आहे. ही दुर्घटना प्रामुख्याने खराब हवामानामुळे घडली असल्याचे त्या अहवालात सांगितले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, एयर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या कमेटीने हा अहवाल तयार केला आहे.

याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी नेमण्यात आली होती.या तपासात आता मोठा खुलासा झाला आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेले हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचे मोठे कारण समोर आले आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे समितीच्या चौकशीतून समोर आले आहे.

रावत यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हे हवाई दलाचे IAF Mi-17V5 प्रकारचे होते. ते प्रवास कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे करत असताना ही घटना घडली आहे. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील मोठ्या पदावरील अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाली असे या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.

Related Stories

सोने 27 महिन्यांच्या उच्चांकावर

Patil_p

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

Abhijeet Khandekar

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर;मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार?

Abhijeet Khandekar

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला

Archana Banage

राज्यातील अनलॉकचा गोंधळ आज दुपारपर्यंत दूर होण्याची शक्यता; विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण

Archana Banage

जेएनपीटी बंदरातून 290 किलो हेरॉईन जप्त

datta jadhav