Tarun Bharat

सीडी प्रकरणातील ‘ती’ युवती मॅजिस्ट्रेटसमोर हजर

प्रतिनिधी / बेंगळूर

वादग्रस्त सीडी प्रकरणातील ‘त्या’ युवतीने मंगळवारी बेंगळूरच्या मॅजिस्टेटसमोर हजर होऊन आपले म्हणणे मांडले आहे. दुपारी वसंतनगर येथील गुरुनानक भवनमध्ये युवतीचे म्हणणे दोन व्हिडीओ कॅमेऱयांमध्ये चित्रित करण्यात आले. यापुर्वी युवतीने आपल्याला एसआयटीवर विश्वास नाही. त्यामुळे आपण न्यायालयासमोर म्हणणे मांडण्यास तयार असल्याचे सांगितले होते.  

सीडी प्रकरणातील युवती मंगळवारी दुपारी 3 वाजता बेंगळूरच्या एसीएमएम न्यायालयात हजर होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी जागा बदलण्यात आली. अखेर वसंतपूर येथील गुरुनानक भवनमध्ये विशेष न्यायालयासमोर युवती हजर झाली. तेथे न्यायाधीशांनी त्या युवतीचे म्हणणे दाखल करून घेतले.

मॅजिस्ट्रेटसमोर म्हणणे मांडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकरणाचा तपास करणाऱया एसआयटीने त्या युवतीला चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले. तिला आडूगोडी येथील टेक्निकल विंगमध्ये नेऊन चौकशी केली. त्यानंतर बौरिंग इस्पितळात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे समजते. याच वेळी तिची कोविड चाचणीही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी देखील चौकशीसाठी हजर होण्यासाठी युवतीला एसआयटीने नोटीस जारी केली आहे.

Related Stories

गोकाक धबधब्याच्या ठिकाणी बॅरिकेड लावले

Rohit Salunke

ऑनलाईन बेटिंग-गेमिंग बंदीचा आदेश रद्द

Amit Kulkarni

धारवाड हद्दीत झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार

Archana Banage

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट कायम

Archana Banage

प्रक्षोभक भाषणप्रकरणी टिकैत यांच्याविरुद्ध एफआयआर

Amit Kulkarni

कर्नाटकात बुधवारी पाच हजाराहून अधिक नवीन बाधित रुग्ण

Archana Banage