Tarun Bharat

`सीपीआर’मध्ये 4 महिन्यांत 354 शस्त्रक्रिया

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात 26 शस्त्रक्रिया केल्या, गेल्या चार महिन्यांत 354 नॉन कोरोना रूग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. यात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत. मध्य प्रदेशातील किडनीचे दोन तुकडे झालेल्या रूग्णांवर 3 शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मतः दोष असलेल्या दोन महिन्यांच्या 2 अर्भकावर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांनी दिली.

येथील सीपीआर हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया विभागात शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. कौस्तुभ मिंच, डॉ. मधुर जोशी, डॉ. सुप्रिया बागुल, डॉ. वसीम मुल्ला, डॉ. प्रदीप राऊत, भुलतज्ञ विभागप्रमुख डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. नमिता, डॉ. सचिन शिंदे, डॉ. मारूती पवार उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, मध्य प्रदेशातील हॉटेल कामगार अतुल पटेल (वय 26) याचा सांगलीत अपघात झाला, त्याला कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुसऱयाच दिवशी हा रूग्ण जगणार नाही, असे पालकांना सांगण्यात आले. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाला होता. डाव्या बाजूच्या किडनीचे दोन तुकडे झाले होते. अशावेळी भुल देणे अवघड होते. तपासणीअंती शस्त्रक्रियेनंतर त्याची तुटलेली किडनी काढून टाकण्यात आली. त्यानंतर पोटातील आतडÎांत झालेल्या रक्तस्राव शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला.. दोन महिने पोट उघडे राहिल्यानंतर ते बंद करण्यासाठी तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. या तीन गुंतागुतीच्या शस्त्रक्रियानंतर अडीच महिन्यांनी त्याला शुक्रवारी घरी पाठवल्याचे सांगितले.

डॉ. हिरूगडे म्हणाले, रत्नागिरी येथील कार्तिक या दीड महिन्याच्या बालकाला धाप वाढल्याने सीपीआरमध्ये दाखल केले होते. सिटी स्कॅनमध्ये त्याच्या पडद्यामध्ये जन्मतः छिद्र होते. त्यामुळे जठराचा भाग छातीत तर हृदय उजवीकडे सरकले होते. नातेवाईकांना विश्वासात घेऊन या बालकावर जानेवारीत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. याद्वारे डावी किडनी, जठर, मोठÎा आतडÎाचा काही भाग डाव्या छातीत आला होता, तो परत पोटात ढकलून पडद्याला पडलेले 5 सेंटीमीटरचे बंद करण्यात आले. सध्या या बाळाला डिसचार्ज देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 दिवसांची बालिका रडत नाही, म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाली. अपुऱया ऑक्सिजनमुळे ते निळसर पडले होते. सिटी स्कॅन तपासणीत त्याच्या फुफ्फुसामध्ये जन्मतः गाठी तयार झाल्या होत्या. त्यामुळे त्याला ऑक्सिजन घेता येत नव्हता. शस्त्रकियेद्वारे गाठी असलेल्या फुफ्फुसाचा भाग काढून टाकण्यात आला. या बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सीपीआरमध्ये कोरोना काळात पॉझिटिव्ह रूग्णांवर केलेल्या 27 शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. शस्त्रक्रिया विभागासाठी 150 बेड आहेत. चार ऑपरेशन थिएटर आहेत. चार महिन्यांत 354 नॉन कोरोना रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

Related Stories

मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ला जयमहाराष्ट्र, वर्षा ते मातोश्री प्रवासादरम्यान भावनिक क्षण

Rahul Gadkar

धामोड येथे चोरटयांनी फोडली चार दुकाने

Archana Banage

इचलकरंजीत चिकन ६५ च्या हातगाडी चालकाचा आत्महत्त्येचा प्रयत्न

Archana Banage

मुलाखत द्यायची कुठे, कधी आणि केंव्हा ?

Archana Banage

इचलकरंजी येथे अल्पवयीन युवतीची छेड काडणाऱ्या एकास अटक

Archana Banage

औद्योगिक ग्राहकांच्या वीज विषयक समस्या सोडवू

Archana Banage
error: Content is protected !!