नवी दिल्ली : सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) बोर्डाच्या शैक्षणिक वर्ष 2021 मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारी रोजी जाहीर केले जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी गुरुवारी यासंबंधी माहिती दिली. पुढील आठवडय़ात वेळापत्रक जाहीर होताच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरही ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांनुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे 2021 ते 10 जून 2021 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते.


previous post
next post