Tarun Bharat

सीबीएसई दहावी परीक्षा परिणाम घोषित

Advertisements

गोव्याचे यश 100 टक्के, इतर चार राज्येही शतप्रतिशत 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा परिणाम घोषित करण्यात आला असून यात गोव्याने 100 टक्के यश संपादन पेले आहे. गोव्याबरोबरच तामिळनाडू, मिझोराम, नागालँड आणि पुदुच्चेरी या चार राज्यांमधील 100 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या परीक्षेला एकंदर 21 लाख 13 हजार 767 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 20 लाख 97 हजार 128 विद्यार्थी यशस्वी ठरले. तर 16,639 विद्यार्थ्यांचा परिणाम अद्यग्नाप घोषित व्हायचा आहे. अघोषित परिणाम केव्हा घोषित होणार हे नंतर सांगण्यात येणार आहे. ही परीक्षा मे ते जून या काळात होणार होती. तथापि, कोरोना उदेकामुळे ती रद्द करण्यात आली. त्यामुळे हे परिणाम विद्यार्थ्यांच्या  कामगिरीच्या आधारावर पर्यायी पद्धतीने तयार करण्यात आले.

विद्यार्थ्यांना इंटरनल असेसमेंटसाठी 20 गुण, युनिट टेस्ट कामगिरीसाठी 10 गुण, अर्धवार्षिक परीक्षेतील कामगिरीसाठी 30 गुण व प्री बोर्ड परीक्षेसाठी 40 गुण निर्धारित करण्यात आले होते. ज्या शाळांनी यापैकी कोणतीही परीक्षा घेतली नसेल  त्यांच्यासाठी वेगळी पद्धती अवलंबण्यात आली होती.

Related Stories

बिहारच्या लपवा-छपवीने मृत्यूसंख्येचा विस्फोट

Amit Kulkarni

देशात सक्रिय रुग्णांमध्ये झपाटय़ाने घट

Patil_p

सहकाराद्वारे दाखवू विकासाचा रोडमॅप

Patil_p

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ला कन्याकुमारीपासून प्रारंभ

Patil_p

नीट-पीजी मॉप अप राउंड रद्द

Amit Kulkarni

भारतीय सैनिकांनी घडवले शत्रुत्वापेक्षा माणुसकीचे दर्शन

Patil_p
error: Content is protected !!