Tarun Bharat

‘सीबीएसई’ 10-12वी वेळापत्रकात बदल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला आहे. काही विषयांच्या पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या असून सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दहावीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या तर, बारावीच्या भौतिकशास्त्र, गणित आणि भूगोल या विषयांच्या पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार दहावीचा विज्ञानचा पेपर 15 मे ऐवजी 21 मे रोजी आणि गणितचा पेपर 21 मे ऐवजी 2 जून रोजी होणार आहे. बारावीच्या परीक्षांमध्ये भौतिकशास्त्राचा (फिजीक्स) पेपर 8 जून रोजी घेण्यात येणार आहे. तसेच विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठीचा मॅथेमॅटिक्स ऍण्ड अप्लाईड मॅथेमॅटिक्स (गणित)चा पेपर 1 जूनऐवजी 31 मे रोजी होणार आहे. कला (आर्ट्स) शाखेचा भूगोलचा (जीओग्राफी) पेपर 2 जूनऐवजी 3 जूनला होणार आहे. सीबीएसई बोर्डांतर्गत दहावी-बारावीची परीक्षा 4 मे रोजी सुरू होणार असून 10 जूनपर्यंत चालणार आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा चार दिवसांसाठी दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत आणि दुसऱया सत्रात दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पेपर होणार आहेत. या परीक्षांचे निकाल 15 जुलै 2021 पर्यंत जाहीर करण्यात येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सुधारित अधिकृत वेळापत्रकासाठी संबंधित शाळा आणि सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळाचा वापर करावा.

Related Stories

ट्रकचालकांना डुलकी लागताच वाजणार सेन्सर

Patil_p

”एकतर महामारी त्यात पंतप्रधान अहंकारी”

Archana Banage

उद्योगपती आनंद महिंद्रा आता ‘वैद्यकीय’ क्षेत्रात

Patil_p

प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवण्यासाठी राहुल गांधींचा होता विरोध; प्रशांत किशोर यांचा खुलासा

Archana Banage

आणखी एका जैन संतांचा प्राणत्याग

Patil_p

महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यांसाठी नवी नियमावली

Patil_p