Tarun Bharat

सीबीटी बसस्थानकाचे काम युध्दपातळीवर

तळमजल्याच्या स्लॅबचे काम  पुर्णत्वाकडे

बेळगाव \ प्रतिनिधी

स्मार्ट सिटी अंतर्गत मध्यवर्ती बसस्थानकाबरोबर सीबीटी बसस्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. विकास साधण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक व सीबीटी बसस्थानक हटवून सुसज्ज बसस्थानकाचे काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे काही काळ बंद असलेले सीबीटी बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर असून तळमजल्याचे काम पुर्णत्वाकडे आले आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी आणि आपुरी जागा लक्षात घेऊन येथील मध्यवर्ती बसस्थानक व सीबीटी बसस्थानक हटवून त्याठिकाणी नवीन स्मार्ट बसस्थानक उभारण्यात येत आहेत. ही बसस्थानके तब्बल 31 कोटी रूपयांचा निधीतून  विकसित केली जात आहेत. मात्र कोरोनामुळे बराच काळ काम रखडलेले पहायला रखडले होते. आता पुन्हा काम हाती घेण्यात आले असून तळमजल्याचे काम प्रगतीपथावर आहे. तीन वर्षापूर्वी या कामाला सुरूवात झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे मध्यंतरी बराच काळ काम बंद होते. या रखडलेल्या कामाला पुन्हा जोरात सुरूवात झाली असून तळमजल्याचे स्लॅब भरणीचे काम जवळ आले आहे.  

सीबीटी बसस्थानकात वाहने घेऊन येणाऱया प्रवाशांसमोर पार्किंग प्रश्न निर्माण व्हायचा. यासाठी सीबीटी बसस्थानकात पार्किंगसाठी तळमजला उभारला असून  या पार्किंगसाठी उभारलेल्या स्लॅबचे काम देखील शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे सीबीटी बसस्थानकात वाहने घेऊन येणाऱया नागरिकांना पार्किंग उपलब्ध होणार आहे.

 बसस्थानक परिसरातील पादचारी व प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक व शहर बसस्थानक (सीबीटी) भुयारी मार्गाने जोडण्याचे काम सुरू असून हे काम देखील आता पुर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे दोन्ही बसस्थानकात ये-जा करण्यासाठी हा भुयारी मार्ग प्रवाशांना सोयीस्कर ठरणार आहे.

Related Stories

अंध, दिव्यांग, ज्येष्ट नागरिकांची बसपासला वाढती मागणी

Amit Kulkarni

दुचाकीस्वाराला वाचविताना बस गटारीत अडकली

Amit Kulkarni

मादिग समाजातर्फे सुवर्णसौध समोर निदर्शने

mithun mane

मराठा बँकेला 2 कोटी 55 लाखाचा नफा

Amit Kulkarni

कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

Amit Kulkarni

बिहार स्टाईल अपहरण, चौकडीला अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!