Tarun Bharat

सीबीटी बसस्थानकाच्या कामाला गती

तळमजल्याचे काम पूर्ण : भुयारी मार्गाच्या कामाला चालना देण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या सीबीटी बसस्थानकाचे काम सध्या गतिमान झाले असून युद्धपातळीवर सुरू आहे. लॉकडाऊन आणि कामगारांच्या कमतरतेमुळे बसस्थानकाचे काम लांबणीवर पडले आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या कामाला आता गती मिळाली आहे. मागील महिन्यात पार्किंगसाठी उभारण्यात आलेल्या तळमजल्याच्या स्लॅबभरणीचे काम पूर्ण झाले आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. जुनी बसस्थानके हटवून नवीन सुसज्ज बसस्थानके उभारण्यात येत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सीबीटी बसस्थानकाच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. सीबीटी बसस्थानकात शहरात व ग्रामीण भागात धावणाऱया बसेस थांबविल्या जाणार आहेत. बसस्थानकात वाहने घेऊन येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तळमजल्यात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सीबीटी बसस्थानकाच्या कामाला विलंब होत होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान परप्रांतिय कामगार मूळ गावी परतल्याने काम थांबले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने काम सुरळीत सुरू आहे. दुसऱया मजल्याच्या कामाला गती आल्याने प्रगतिपथावर आहे.

भुयारीमार्गाच्या कामाला चालना देण्याची गरज

बसस्थानक परिसरात पादचारी आणि प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात येत आहे. दोन्ही बसस्थानके जोडण्यासाठी हा भुयारी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून भुयारी मार्गाचे काम ठप्प झाले आहे. या अर्धवट स्थितीत असलेल्या व रखडलेल्या कामामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाच्या कामाला चालना देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

महालक्ष्मी यात्रेसाठी हिंडलगा सज्ज

Amit Kulkarni

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन बेळगाव २०२२

Amit Kulkarni

झेन स्पोर्ट्स संघाकडे ‘श्री चषक’

Amit Kulkarni

एक खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱया खड्डय़ात लोटांगण

Amit Kulkarni

मच्छेत साकारलंय वन उद्यान

Patil_p

यमनापूरनजीकचा वाहन पार्किंगचा अडथळा दूर करण्याची मागणी

Patil_p
error: Content is protected !!