Tarun Bharat

सीबीटी बसस्थानकाच्या दुसऱया मजल्याची स्लॅबभरणी

कामाला चार वर्षे उलटली, अद्याप निम्मे काम शिल्लक, पार्किंगची सोय

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या दुसऱया मजल्याच्या स्लॅबभरणीचे काम सोमवारी करण्यात आले. दुसऱया मजल्याच्या स्लॅब भरणीसाठी तब्बल चार वर्षांचा कालावधी लागला आहे. मागील काही दिवसांपासून रखडलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या कामाला काहीप्रमाणात गती आली आहे.

मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. तब्बल 102 कोटींच्या निधीतून ही स्मार्ट बसस्थानके उभारली जात आहेत. मात्र मागील काही दिवसांत कोरोना आणि इतर कारणांमुळे कामे लांबणीवर पडली होती. मात्र आता विकेंड आणि नाईट कर्फ्यू रद्द झाल्याने कामाला गती प्राप्त झाली आहे.

सीबीटी बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीखातर तळमजल्यामध्ये सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेवून येणाऱया प्रवाशांना पार्किंग उपलब्ध होणार आहे. शिवाय दोन्ही बसस्थानकांना जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. सीबीटी बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होवून चार वर्षांहून अधिक   काळ उलटला आहे. मात्र अद्याप निम्मे काम शिल्लक आहे. सध्या कामाला काहीप्रमाणात जोर आला असून दुसऱया मजल्याचे स्लॅब भरण्यात आले आहे.

बसस्थानक कामाच्या उद्घाटनप्रसंगी काम दोन वर्षात पूर्ण होईल, अशी आश्वासने लोकप्रतिनिधींनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात चार वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप निम्मे काम शिल्लक आहे. त्यामुळे सीबीटीचे काम पूर्ण व्हायला अद्याप किती दिवस लागणार आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.

Related Stories

दांडेलीत 72 लाखांच्या बनावट नोटा जप्त

Amit Kulkarni

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे तिळगूळ समारंभ

Amit Kulkarni

कणबर्गी तलावातील मासे मृतावस्थेत

Amit Kulkarni

ऊस पिकाला 5500 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी

Amit Kulkarni

नुपूर शर्मा-नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करा

Amit Kulkarni

अनगोळ, सिद्धकला, एपीएस, अलरझा संघ उपांत्य फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!