Tarun Bharat

सीमाबांधवांचा कोल्हापुरात एल्गार !

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेली पासष्ट वर्षे कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचारांचा सामना करत लोकशाही मार्गाने सीमालढा तेवत ठेवणाऱया सीमावासीयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. `आता महाराष्ट्रात यायचचं’ या भावनेने पुन्हा एकदा सीमाबांधवांनी कोल्हापुरात रणशिंग पुंकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शनिवार, 30 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळÎाच्या साक्षीने एक दिवसाचे धरणे सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सीमाभागातून मराठी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमधील सर्व राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, खासदार, आमदार, मंत्री यांच्यासह विविध संघटना, संस्था आणि त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या धरणे सत्याग्रहाला पाठबळ देवून सीमाबांधवांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी केले आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील या धरणे सत्याग्रहाच्या तयारीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सीमाभागात गेल्या आठवडÎापासून जनजागृती करण्यात येत आहे. समितीच्या पदाधिकाऱयांनी गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूरमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार तसेच विविध संघटनांच्या भेटी घेऊन त्यांना सत्याग्रह आंदोलनाला पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे.

           दसरा चौकात धरणे सत्याग्रह 

सीमाबांधवांचे धरणे सत्याग्रह आंदोलन ऐतिहासिक दसरा चौकात शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 यावेळेत होणार आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. तमाम करवीरवासीयांनीही या आंदोलनात सहभागी होऊन सीमावासीयांना पाठबळ द्यावे, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

1956 च्या आंदोलनातील ज्येष्ठ सत्याग्रहींचा सहभाग

सीमालढ्याच्या 1956 च्या पहिल्या आंदोलनात सहभागी होऊन कारावास भोगून अनंत यातना सहन केलेले आणि सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी, याकडे आस लागून राहिलेले ज्येष्ठ सत्याग्रही निडगलचे शंकरमामा पाटील, कसबा नंदगडचे पुंडलिकमामा चव्हाण, जळगे गावचे नारायणमामा लाड, कुपटगिरीचे नारायणराव पाटील, करंबळचे दे. भ. उर्फ देवाप्पा घाडी गुरूजी आदींसह अनेक ज्येष्ठ सत्याग्रही कोल्हापुरातील या धरणे सत्याग्रहात सहभागी होणार आहेत.

कोल्हापुरात स्थायिक झालेल्या सीमाबांधवांना आवाहन

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्थायिक झालेल्या सीमाभागातील मराठी बांधवांनी शनिवारच्या या धरणे सत्याग्रह आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन म. ए. समितीने केले आहे.

Related Stories

कोगनोळी नाक्मयावर प्रवाशांची तपासणी

Amit Kulkarni

विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांच्या हत्येप्रकरणी मुंबईत एकाला अटक

prashant_c

दुसऱया मजल्यावरुन पडून हिंडलगा येथील तरुणाचा मृत्यू

Patil_p

कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच ड्रेनेज चेंबर

Patil_p

‘मरिला डिस्कव्हरी’ क्रुझवर अडकलेले खलाशी उतरणार मुंबई बंदरावर

prashant_c

कर्नाटकात पहिले लांडग्यांसाठी वन्यजीव अभयारण्य होण्याची शक्यता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!