Tarun Bharat

सीमावर्ती भागात दरोडेखोरांचा उच्छाद

महाराष्ट्रातही चोऱया-घरफोडय़ांच्या घटनांमध्ये वाढ, तरुणांनी गस्त घालण्याचे पोलिसांचे आवाहन

प्रतिनिधी /बेळगाव

महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील गावांमध्ये दरोडेखोरांच्या कारवाया वाढल्या आहेत. सीमेवरील गावात चोऱया, घरफोडय़ा करून या टोळीतील गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील पोलिसांनी संयुक्तपणे प्रयत्न सुरू केले आहेत.

गेल्या आठवडय़ात अथणी व कागवाड तालुक्मयात या टोळीने अक्षरशः हैदोस घातला होता. केवळ हे दोनच तालुके नव्हे तर महाराष्ट्रातील मिरज ग्रामीण, जत, उमदी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातही अशाच पद्धतीचे गुन्हे घडले आहेत. यामुळे या टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यासाठी बेळगाव पोलिसांचे एक पथक एलसीबीच्या संपर्कात आहे.

ऐनापूर येथे एका रात्रीत 13 घरफोडय़ा तर शेजारच्या मोळे येथे एका रात्रीत 5 घरफोडय़ा झाल्या होत्या. चोऱया, घरफोडय़ांनंतर जाग आलेल्या तरुणांनी चोरटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शस्त्रांचा धाक दाखवत चोरटय़ांनी तेथून पलायन केले आहे. अथणी, कागवाड तालुक्मयात अक्षरशः गुन्हेगारांची दहशत निर्माण झाली आहे.

यासंबंधी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता अथणी व कागवाड तालुक्मयात चोऱया-घरफोडय़ा वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील गावातही गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. त्यामुळे संयुक्तपणे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीमाभागात धुडगूस घालणाऱया गुन्हेगारांना लवकरच अटक करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलीस दलाला मिळालेल्या माहितीनुसार सीमेवरील गावात सुरू असलेल्या गुन्हय़ांमागे महाराष्ट्रातील टोळय़ांचा सहभाग आहे. या टोळीतील गुन्हेगारांविषयी माहिती मिळाली असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत.  शेजारच्या सांगली व कोल्हापूर जिल्हय़ातही गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. खासकरून कोल्हापूर जिल्हय़ात बंटी-बबली टोळीचे कारनामे वाढले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांचे पोलीस एकमेकांच्या संपर्कात आहेत.

बेळगावातही चोऱया वाढल्या

केवळ सीमेवरील गावातच नव्हे तर बेळगाव शहर व तालुक्मयातही चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमेवरील गावात तर आता त्या त्या गावातील तरुणांनी आपापल्या गावात गस्त घालावी, तुमच्या मदतीला पोलीस असतील, असे आवाहन पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अनोळखी माणसांनी आवाज दिला तर दरवाजा उघडू नका. एकाकी फिरू नका. गटागटानेच फिरत रहा. दागिने, रक्कम लॉकरमध्ये ठेवा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

अनर्थ घडल्यानंतर मनपाला जाग येणार का?

Amit Kulkarni

ग्रा. पं. निवडणुकांमुळे स्पर्धांना येणार अच्छे दिन

Patil_p

‘नीट’ परीक्षा पुढे ढकलल्याने सरकारच्या निर्णयाचा निषेध

Patil_p

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

Amit Kulkarni

स्वच्छता निरीक्षकांकडे बंदोबस्ताची जबाबदारी

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Tousif Mujawar