Tarun Bharat

सीमावादाबाबत नेपाळची नरमाईची भूमिका

Advertisements

ऑनलाईन टीम / काठमांडू : 

नेपाळने भारतासोबतच्या सीमावादाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांनी भारतासोबतचा सीमावाद चर्चेतून सोडवू,असे म्हटले आहे. 

भारताच्या लिपुलेख, कालापानी आणि लिपिंयाधुरीसह भारताच्या 392 चौ किमी भूभागावर नेपाळने दावा ठोकला होता. या भूभागाचा मागील वर्षी नेपाळच्या नकाशातही समावेश करण्यात आला, त्याला नेपाळ संसदेने मान्यता दिली. त्यामुळे भारत आणि नेपाळचे संबंध काहीसे बिघडले आहेत.

मात्र, या भूभागाच्या वादावर भारतासोबत खुली आणि मैत्रीपूर्ण चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान ओली यांनी एका परिसंवादात म्हटले आहे. मागील महिन्यात नवी दिल्लीत दोन्ही देशातील मंत्री स्तरावर यासंदर्भात बैठक पार पडली. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही.

Related Stories

कोरोना नष्ट करणाऱया अँटीबॉडीचा शोध

Patil_p

इन्स्टाग्रामवरील फेमस किड, लाखोंची कमाई

Patil_p

दिग्गज सीईओंना मागे टाकत वेतन कमाईत महिला सीईओ अव्वल

Patil_p

उष्णतेच्या लाटेमुळे युरोप बेहाल

Patil_p

जपान पंतप्रधानांचा भारत दौरा लांबणीवर

Patil_p

‘एससीओ’ची ऑनलाईन शिखर परिषद 10 नोव्हेंबरला

datta jadhav
error: Content is protected !!