Tarun Bharat

सीमाहद्दीवर धुमाकूळ घातलेल्या ‘त्या’ गव्याचा अखेर मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाहद्दीवर धुमाकूळ घातलेल्या गवीरेडय़ाचा अखेर मृत्यू झाला. सीमाहद्दीवरील बेकिनकेरे, अतिवाड व चंदगड तालुक्मयातील होसूर, कौलगे, किटवाड, कुदनूर आदी परिसरात गव्याने धुमाकूळ घातला होता. शेतकऱयांना हा गवा अचानक निदर्शनास येत होता. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते. कुदनूर (ता. चंदगड) येथील शिवारात शनिवारी या गव्याने हल्ला चढवून आनंदी बंबर्डेकर, माधुरी खांबकर, यल्लूबाई बंबर्डेकर व मेंढपाळ बसप्पा हिरेगुड्डी यांना जखमी केले होते. दरम्यान, वनविभागाचे वनपाल गव्याला पकडण्यासाठी नजर ठेवून होते. अखेर हा गवा कौलगे (ता. चंदगड) येथील तलावानजीक मृतावस्थेत सापडला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाहद्दीवर असलेल्या डोंगर भागात गवे, रानडुक्कर, तरस, इतर वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, उन्हाळय़ाच्या दिवसात डोंगरात वन्यप्राण्यांना चारा उपलब्ध नसतो. त्यामुळे हे वन्यप्राणी चारा व पाण्यासाठी डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात फिरतात. गव्यांच्या कळपातून चुकून आलेला हा गवा सैरभैर झाला होता. दरम्यान, हैदोस घातलेल्या गव्याने अनेक शेतकऱयांना जखमी केले. अखेर रविवारी वनविभागाच्या हाती लागण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी दिली.

Related Stories

संतीबस्तवाड कबड्डी स्पर्धेत देसुरचा संघ विजेता

Amit Kulkarni

‘त्या’ 11 जुगाऱयांवर गुन्हा दाखल

Patil_p

व्यावसायिक हजारो; परवान्यांची नोंदणी 9624

Amit Kulkarni

रेल्वे स्थानकाचा चेहरा आता बदलणार

mithun mane

रेमडेसिवीर वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण

Amit Kulkarni

अनगोळ ते बेम्कोपर्यंत वाहतुकीची कोंडी

Amit Kulkarni