Tarun Bharat

सीमा बांधवांच्या समर्थनात करवीर तालुक्यातील शिवसैनिक उतरले मैदानात

Advertisements

उचगांव हायवे चौकात काळे झेंडे घेऊन निदर्शने

वार्ताहर / उचगाव

भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगाव, निपाणी, बिदर व भालकीसह ८६५ मराठी भाषिक गावे जबरदस्तीने कर्नाटकात घुसडण्यात आली. कानडी अत्याचाराविरोधात लोकशाही मार्गाने लढा देत मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या ६५ वर्षापासून झगडत आहेत. आता चौथी पिढीही सीमा लढ्यात सक्रिय झाली आहे. दरवर्षी दि. १नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्य स्थापनेच्या दिवशी कडकडीत सुतक, हरताळ व काळा दिन पाळून मराठी भाषिक काळी वस्त्रे व झेंडे घेऊन मूक सायकल फेरी काढून कर्नाटक सरकारचा निषेध करतात व महाराष्ट्रात येण्याचा निर्धार व्यक्त करतात. कायद्याची बंधने तसेच सारे निर्बंध पाळत आजपर्यंत मराठी भाषिकांनी लढा तेवत ठेवला म्हणून आम्ही करवीर शिवसेनेच्यावतीने सीमा बांधवांच्या समर्थनात काळे झेंडे घेऊन कर्नाटकच्या विरोधात जोरदार निदर्शने करून संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव बोलताना म्हणाले की आम्ही सीमा बांधवांच्या पाठीशी व आम्ही सीमा बांधवा सोबत सीमालढ्यात हुतात्मे झालेल्या बांधवांना विसरू शकत नाही. मराठी अस्मिता व मराठी संस्कृती टिकवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अशा मराठी भाषिकांना मानाचा मुजरा करतो. जोपर्यंत कर्नाटकात घुसडलेला मराठी बहु भाग व सीमा बांधव जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत हा संयुक्त महाराष्ट्र अपूर्णच राहिल. आम्हाला आशा आहे की सीमा बांधवांच्या त्यागाला व बलिदानाला यश नक्कीच मिळेल.

खेताजी राठोड, अजित चव्हाण, अजित पाटील, सचिन बोराटे, भरत भाटी, बंडा पाटील, शैलेस पवार, बाबुराव पाटील, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, ओंकार राठोड, सुनील ठोबर, किरण शिंगे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यपालांच्या ‘आंतरराज्य समन्वय’ बैठकीला सुरुवात

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत साजरा होणार शिवस्वराज्य दिन

Archana Banage

मीडियाला कळते मग पोलिसांना का नाही : देवेंद्र फडणवीस

Archana Banage

राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी कबनूरमधील 3 खेळाडूंची निवड

Abhijeet Khandekar

बेनिक्रेतील अपंग तरुणाची सैन्यभरतीत भरारी

Archana Banage

कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा

Archana Banage
error: Content is protected !!