Tarun Bharat

सीमा सुरक्षेसाठी 5500 कॅमेरे बसविणार

बीएसएफ महासंचालकांनी दिली माहिती ः ड्रोनचा करणार विशेष वापर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशाच्या सीमासुरक्षेसाठी बीएसएफ अनेक पावले उचलत आहे. सीमासुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी 30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सीमेवर आता 5500 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती बीएसएफ महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी बुधवारी दिली आहे.

सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ड्रोन्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर करणार आहोत. यामुळे कुठल्याही प्रकारच्या घुसखोरीवर नजर ठेवता येणार आहे.  पूर्व आणि पश्चिम सीमेवर सर्वप्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच या कॅमेऱयांना परस्परांशी लिंक करण्यात आले आहे. आमच्यासमोर शत्रूकडून होणाऱया ड्रोन वापराचे मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्ण यंत्रणा तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचे बीएसएफ महासंचालकांनी म्हटले आहे.

आमच्याकडे आता अधिक प्रमाणात साधनसामग्री असून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. यामुळे जम्मू क्षेत्रात ड्रोनच्या कारवाया बऱयाच अंशी कमी झाल्या आहेत. पंजाबमध्ये देखील बीएसएफ दर आठवडय़ाला ड्रोन पाडवत आहे. पूर्वी हे घडत नव्हते. यातून आम्ही अत्यंत सतर्क आहोत हे स्पष्ट होते. ड्रोन्सच्या कारवाया रोखण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत. आगामी वर्षांमध्ये ड्रोनच्या कारवाया रोखण्यास आम्ही पूर्णपणे सक्षम ठरणार आहोत. सायबर सुरक्षेकरता आम्ही सुविधा निर्माण करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

हिमाचलमध्ये मलेशियाच्या महिलेचा मृत्यू

Patil_p

राज्यात 12 जणांना कोरोनाचा संसर्ग

Patil_p

जीवन्मुक्त

Patil_p

खासगी रेल्वे 2023 पासून धावणार

datta jadhav

रेल्वे काय भाजपची नोकर आहे का? ; राऊतांचा रावसाहेब दानवेंवर पलटवार

Archana Banage

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

Archana Banage