Tarun Bharat

सीरम इन्स्टिट्यूट लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करणार

आदर पूनावालांनी दिली माहिती

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हा एकमात्र पर्याय असल्याचे केंद्राने सांगितले होते. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशात लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली. याचा फायदाही झाला असून कोरोना संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. देशात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर लसीकरण मोहिमेला वेग आला. देशात एकाच वेळी सर्वत्र लसीकरण सुरु असल्याने राज्यांना लसीचा पुरवठा कमी होऊ लागला. केंद्राने कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि अन्य लसी राज्यांना मोफत देण्यास सुरवात केली. केंद्राच्या मागणी नुसार कंपन्या लस पुरवठा करत होत्या. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया केंद्राला कोविशील्ड लसीचा पुरवठा करत होती. पण आता सीरम इन्स्टिट्यूट कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करणार आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी दिली. केंद्राकडून लसीची मागणी नसल्यामुळे कोविशील्डचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यापासूनच लसीचं उत्पादन कमी केलं जाणार असल्याचंही सीएनबीसी टीव्ही १८ शी बोलताना ते म्हणाले.

उत्पादन कमी केलं जाणार असलं तरी देशाला अचानक मोठ्या प्रमाणात लसीची गरज भासल्यास तेवढा साठा ठेवणार असल्याचं ते म्हणाले. “मला आशा आहे की अशी वेळ कधीच येणार नाही, परंतु जर गरज पडली तर पुढचे सहा महिने आम्ही लस देऊ शकत नाही, अशी सांगण्याची वेळ मला येऊ द्यायची नाही,” असे पूनावाला म्हणाले. तसेच भविष्यात देशातील जनतेसाठी कोणताही धोका न पत्करता आपण स्पुटनिक लाइट लसीचे २० ते ३० दशलक्ष डोस साठवणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

दरम्यान जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या लसींच्या परिणामकारकतेबद्दल बोलताना पूनावाला म्हणाले की, “आता असलेल्या लसी ओमायक्रॉनवर परिणामकारक ठरणार नाही, यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आपल्याला या विषाणूपासून संरक्षण मिळणार नाही, असंही मानलं जाऊ नये. अॅस्ट्राझेनाकाची लस विषाणूंविरूद्ध ८०% परिणामकारक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय,” अशी माहिती त्यांनी दिली.

Related Stories

जम्मू काश्मीर : गुलमर्गमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

देहू-आळंदी पालखी सोहळयाबाबत दोन दिवसात निर्णय : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Abhijeet Shinde

PM मोदी घेणार ओमिक्रॉनचा आढावा

datta jadhav

सुधीर मुनगंटीवार अन् आता नाना पटोले चर्चेत; भाजपच्या ‘वंदे मातरम्’नंतर, काँग्रेसचं ‘जय बळीराजा

Abhijeet Khandekar

पुणे विभागातील 4. 91 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

औंधचा लाडका गजराज उर्फ मोती हरपला.

Patil_p
error: Content is protected !!