Tarun Bharat

सीसीआय, विजया क्रिकेट अकादमी संघाची विजयी सलामी

आनंद चषक क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

आनंद क्रिकेट अकादमी आयोजित आनंद चषक 11 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनाच्या दिवशी विजय क्रिकेट अकादमीने नीना स्पोर्ट्सचा 46 धावांनी, सीसीआयने बीएससीचा संघाचा 29 धावानी पराभव करून विजयी सलामी दिली. स्वयंम के व महंमद हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

भुतरामहट्टी येथे भरतेश स्कूलच्या मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन दर्शन गडकरी, प्रवीण कुंदप, चंदन कुंदरनाड, मिलिंद चव्हाण, हेमंत जाधव, आनंद करडी, माजीद मकानदार यांच्या उपस्थितीत यष्टीपूजनाने करण्यात आले.

सीसीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 127 धावा केल्या. त्यात जीरीनने 22, संकेतने 19, आयुषने 16 धावा केल्या. बीएससीतर्फे तनिष्क व लाकेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बीएससीचा डाव 18 षटकात सर्वबाद 98 धावात आटोपला. अवनिषने 29, दर्शनने 15 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयंमने 4, संकेत-सार्थक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात विजया क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 बाद 159 धावा केल्या. हमजाने 28, अर्जुनने 19, अतिथीने 18 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नीना संघाचा डाव 16 षटकात 113 धावात आटोपला. त्यात सुफियानने 18, पार्थने 19 धावा केल्या. विजयातर्फे महंमद हमजा व अतिथी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

मंगळवारचे सामने – आनंद अकादमी वि. नीना स्पोर्ट्स सकाळी 9.15 वा., दुसरा सामना सीसीआय वि. एसकेई यांच्यात दुपारी 1.30 वा.

Related Stories

आत्मनिर्भरसाठी परस्परांना सहकार्य करा

Omkar B

‘महाविद्यालये बंद’चे ‘व्हायरल’ परिपत्रक खेटे

Amit Kulkarni

गोहत्या बंदी विधेयक संमत झाल्याने कारवार जिल्हय़ात आनंदोत्सव

Patil_p

सारस्वत वधूवर मंडळ, बेळगावतर्फे वधू वर मेळावा

Omkar B

बुडाच्या भूखंडाला प्रतिगुंठा 42 लाखाची बोली

Amit Kulkarni

आम्हालाच कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्या

Amit Kulkarni