Tarun Bharat

सी. टी. रवी मंत्रिपदाचा राजीनामा देणार

बेंगळूर

 राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुख्य सचिवपद मिळालेले सी. टी. रवी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी ही माहिती दिली आहे. तुमकूर येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना नलीनकुमार कटील म्हणाले, पक्षात ‘एका व्यक्तीला एकच पद’ असा नियम आहे. याची जाणीव सी. टी. रवी यांना देखील आहे. त्यामुळे ते स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत, असे ते म्हणाले. अलिकडेच सी. टी. रवी यांची नेमणूक भाजपच्या राष्ट्रीय मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.

Related Stories

काँग्रेसमधील लिंगायत नेते येडिंच्या पाठीशी

Amit Kulkarni

कर्नाटक: काँग्रेसचा ‘हा’ ज्येष्ठ नेता कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

यादगीर जिल्हय़ात अपघातात पाच महिला ठार

Amit Kulkarni

प्रलंबित जीएसटी भरपाई देण्याचे अर्थमंत्र्यांचे आश्वासन : मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

कर्नाटक: “…तर योगेश्वर मंत्रिमंडळ सोडण्यास मोकळे”

Archana Banage

धारवाड जवळ भीषण अपघात; ९ जण जागीच ठार

Archana Banage