Tarun Bharat

सी फोर्ट सर्किट टूरिझम प्रकल्प राबवा – खासदार संभाजीराजे

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाराष्ट्रातील जलदुर्गांचे वैभव सागरी पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचावे, यासाठी ‘सी-फोर्ट सर्किट टूरिझम्’ प्रकल्प शासकीय स्तरावर राबविला जावा, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या चार वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. याबाबत खासदार संभाजीराजे यांनी आज भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालिका व्ही. विद्यावती जी यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या प्रकल्पाअंतर्गत सर्व जलदुर्गांना जेटी बांधणे. यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यामुळे नुकतेच सुवर्णदुर्ग व पद्मदुर्ग या किल्ल्यांना जेटीसाठी मंजूरी मिळाली असून, संपूर्ण आराखडा पर्यटन विभागाकडे पाठविला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने यापूर्वीच तत्त्वतः मंजूरी दिलेली असून लवकरच यासाठी अंतिम मंजूरी दिली जाईल, असे विद्यावती यांनी यावेळी संभाजीराजे यांना सांगितले. मार्च 2022 साली जेटी बांधण्याचे काम सुरू होऊन मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल, तसेच जंजिऱयाच्या जेटीचे नूतनीकरण व खांदेरी, उंदेरीसह इतरही जलदुर्गांच्या जेटी उभारण्याची प्रक्रिया देखील लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे डायरेक्टर अमित सैनी यांनी दिल्याचे खासदार संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

सुवर्णदुर्ग व पद्मदुर्ग हे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्याच्या आरमारी इतिहासात या किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राला लाभलेले जलदुर्गांचे वैभव व त्यांचा गौरवशाली इतिहास जगभरात पोहोचण्यामध्ये ‘सी-फोर्ट सर्किट टूरिझम्’ प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील पर्यटक यामुळे महाराष्ट्राकडे आकर्षित होतील. शिवाय, पर्यटनवृद्धीच्या माध्यमातून रोजगारही मोठÎा प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रतिपादन यावेळी खासदार संभाजीराजे यांनी केले.

Related Stories

कोरोना महामारीतही ‘मृत्यू दरात घट’..!

Archana Banage

राज्यात शंभर टक्के सत्ताबदल होणार – प्रवीण दरेकर

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना नकारात्मक अहवाल असणे बंधनकारक

Archana Banage

सातारात जिल्हा परिषदेत बदल्याचे सत्र सुरू

Archana Banage

सांगरुळच्या मैदानात भारत मदनेचा विशाल बनकरला बॅक थ्रो

Archana Banage

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्था कार्यकारी समितीवर चेतन नरके यांची निवड

Archana Banage
error: Content is protected !!