Tarun Bharat

सी बर्ड कारवार ते नवी दिल्लीपर्यंत नौदलातर्फे मोटरसायकल प्रवास मोहिमेला प्रारंभ

प्रतिनिधी /वास्को

भारतीय नौदलातर्फे कारवार ते नवी दिल्लीपर्यंत मोटरसायकल प्रवास मोहिम हाती घेण्यात आली आहे. स्वर्णीम विजय अभियान अशा शिर्षकाखाली स्वर्णीय विजय वर्ष व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ही मोहिम असून योगायोगाने याच क्षणी नौदलाला प्रेसिडेन्ट कलर सन्मान प्राप्त झालेला आहे. सोमवारी कारवार येथील सी बर्ड तळावरून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. येत्या दि. 3 ऑक्टोबर पर्यंत ही मोहिम चालणार आहे.

50 पेक्षा जास्त नौदल कर्मचारी अकरा मोटरसायकल व दोन सपोर्ट वाहनांसह या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ही मोहिम कारवार ते नवी-दिल्लीपर्यंत 6,000 किलो मीटर अंतर पार करेल.

या मोटरसायकल मोहिमेतील मोटरसायकल राईडर्स नॅशनल डिफेन्स अकादमी, सातारा येथील सैनिक स्कुल, बालाचडी, कापुरथाला व कुंजपुरा व राष्ट्रीय मिलिटरी स्कुल, चैल येथील कॅडेटस व कर्मचाऱयांशी संवाद साधतील.  तसेच लोणावळा येथील नौदल विभाग, पोरबंदर व जामनगर येथील भारतीय लष्कर व इंडियन एअर फोर्सच्या आस्थापनाना भेटी देतील.

काल सोमवारी कारवारच्या नौदल जहाज दुरूस्ती यार्डचे रिअर ऍडमिरल डी. के. गोस्वामी यांनी आयएनएस विक्रमादित्य येथून या मोहिमेला बावटा दाखविला.

Related Stories

कविता ही जगण्याची भाषा : दशरथ परब

Amit Kulkarni

मगरींचा लोकवस्तीपर्यंत संचार वाढला

Omkar B

वाहतूक पोलिसांचे ‘दिसताक्षणी तालांव’ सत्र

Omkar B

किनारी व्यवस्थापन आराखडय़ात गंभीर चुका

Amit Kulkarni

‘त्या’ महिलेची ओळख उघड करणे अयोग्यच

Amit Kulkarni

दूध उत्पादक नसलेलेच गोवा डेअरीच्या निवडणुकीत उतरणार ?

Amit Kulkarni