Tarun Bharat

सुंदर दिसण्यासाठी पितात कोब्राचे रक्त

इंडोनेशियातील विचित्र प्रकार

कायम तरुण आणि सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. याकरता काही जण कॉस्मेटिक तर काही जण नैसर्गिक उपचार करतात. अनेक जण सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेत असल्याचेही समोर आले आहे. सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल याचा नेम आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथील महिला सुंदर दिसण्यासाठी विषारी सापाचं रक्त पितात.

एरव्ही सापाला समोर बघितलं तरीही अनेकांची बोबडी वळते, सापाचा दंश थेट मृत्यूच्या दारात नेतो. पण जकार्तातील महिला कोब्रासारख्या विषायी सापाचं रक्त आवडीने पितात. कोब्रा सापाचं रक्त पिण्याची प्रथा इथे फारच जुनी आहे.

जकार्तामध्ये सापाच्या रक्ताची मागणी मोठी आहे. यासाठी तेथे दररोज हजारो साप कापले जातात. सापाचं रक्त प्राशन केल्यावर तीन ते चार तास चहा किंवा कॉफी पिण्यास मनाई असते. सापाचं रक्त व्यवस्थितरित्या शरीरात पसरण्याचा यामागे हेतू असतो. पुरुष देखील आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सापाचं रक्त पित असतात. तर महिला सुंदर दिसण्यासाठी हा प्रकार करतात. सापाचं रक्त प्यायल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहते अशी जकार्तामध्ये मान्यता आहे.

संबंधित दुकानदार दिवसभरात सापाचं रक्त विकून 5 ते 10 लाख रुपये कमावत आहेत. दुसरीकडे इथल्या सैनिकांना सापाचं रक्त प्राशन करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून युद्धाच्या वेळी सापाचं रक्त पिऊन जगता येईल.

Related Stories

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ‘किरणोत्सव सोहळा’

Tousif Mujawar

पुणे : महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सव ‘ऑनलाईन’ व साधेपणाने

Tousif Mujawar

झोपण्याचा विक्रम : 6 लाख कमावले

Patil_p

जगातील पहिला रेप्टाइल कॅफे

Amit Kulkarni

कोंबडय़ाचे कौतुक भीकबाळी घालून

Patil_p

आषाढीनंतर निर्बंधाची ‘कार्तिकी वारी’

Omkar B