Tarun Bharat

सुकळवाड पंचायत समिती मतदार संघात नांदोस व खोटले येथे लसीकरण संपन्न

Advertisements

सभापती अजिंक्य पाताडे यांचे प्रयत्न; 300 जणांना लाभ

सुकळवाड / प्रतिनिधी- 

सुकळवाड पंचायत समिती मतदारसंघात नांदोस ग्रामपंचायत तसेच खोटले हायस्कूल येथे सभापती अजिंक्य पाताडे यांच्या हस्ते आज रोजी लसीकरण शुभारंभ करण्यात आला. यावेळी नांदोस व खोटले अंतर्गत हेदुळ, वायंगवडे येथील ग्रामस्थांनी लसीकरण लाभ घेतला. खोटले येथे 200 डोस तर नांदोस येथे 100 डोस सभापती अजिंक्य पाताडे यांच्या मागणीनुसार जिल्हापरिषद कडून लसीकरण करण्यात आले .बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण तसेच माजी सभापती संतोष साटविलकर यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. सदर मागणी पूर्ण केल्याबद्दल सभापती यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.     

नांदोस येथील लसीकरण वेळी सरपंच आरती नांदोसकर,सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण,विजय निकम,अशोक नांदोसकर तर खोटले येथे सरपंच कमलेश परब ,वायंगवडे सरपंच आनंद सावंत, हेदूळ सरपंच नंदकिशोर गावडे आदी उपस्थित होते.

Related Stories

भिंत खचली, चूल विझली..!

NIKHIL_N

जिह्यात दिवसाला 3 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या

Patil_p

आणखी 58 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

NIKHIL_N

रत्नागिरीत मच्छीमार बोट बुडाली

Patil_p

रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे रुग्णालयांना 47 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर

NIKHIL_N

पहिल्या 30 किमी समुद्री मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरची सुबिया मुल्लाणी प्रथम

NIKHIL_N
error: Content is protected !!