Tarun Bharat

सुकूरचे सरपंच अनिल पेडणेकर यांच्यावर 6 जणांचा अविश्वास ठराव दाखल

प्रतिनिधी / म्हापसा

राजकीय घडामोडीत 15 दिवसापूर्वीच सुकूर पंचायतीमध्ये सरपंचाच्या खुर्चीवर विराजमान झालेले सरपंच अनिल पेडणेकर यांच्यावर सहा पंच सदस्यांनी अविश्वासाची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या पंचायतीवर भाजपचे वचस्व होते मात्र आमदार रोहन खंवटे यांनी आपले वर्चस्व दाखवित भाजपकडून हि पंचायत हीसकावून घेत आपले मर्जीतील अनिल पेडणेकर यांना सरपंचाच्या खूर्चीवर बसविले होते मात्र आता त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणारे काही भाजप तर काही आमदाराचे समर्थक असल्याचे आता येथे गेंधळच निर्माण झाला आहे.

अविश्वास ठरावाची नोटीस बजावतांना सरपंचानी विकास कामे साधताना विश्वासात घेतले नाही. बेकायदेशीर कामावर कारवाई करण्यास सरपंच असमर्थ ठरले. बेकायदेशीर कामांना सरपंचाच्या कारकिर्दीत वाढ झाली. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरपंच यशस्वी झाले नाही असे आरोप लावत यानोटीसीवर संदीप मांजरेकर, माया केणी, रेश्मा मोरजकर, खळू पेडणेकर, संजय पेडणेकर डिस्ट्रोसा लोबो यांनी सह्या केल्या आहेत.

Related Stories

ऐन थंडीत राजकारणात वाढली गरमी!

Amit Kulkarni

थिवी मतदारसंघात कोविड लसीकरणास उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

ही तर उदरनिर्वाहासाठी संघर्षाची लढाई

Patil_p

कुर्टी-फोंडा येथे मालवाहू ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

Patil_p

काणकोणच्या चापोली धरणाचा जलाशय तुडुंब

Omkar B

वेलिंग येथील श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी देवीच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

Amit Kulkarni