कॅनडाच्या एल्बर्टा प्रांताच्या सरकारने सुटी व्यतित करण्यासाठी विदेशात गेलेल्या 7 सदस्यांवर कारवाई केली आहे. कॅनडात कोरोनापासून बचावासाठी लोकांना प्रवास टाळण्यास सांगण्यात आले आहे. प्रांताचे मुख्यमंत्री जेसन केनी यांनी यापूर्वीच अधिकाऱयांना सुटीकरता देशाबाहेर जाण्याची अनुमती नाकारली होती. सुटीनिमित्त विदेशात गेलेल्या चीफ ऑफ स्टाफला कार्यमुक्त केले आहे. तर शहरविषयक मंत्र्याचा राजीनामा स्वीकारल्याचे जेसन यांनी म्हटले आहे. केनी यांनी स्वतःच्या युनायटेड कॉन्झरर्वेटिव्ह पार्टीच्या 5 अन्य सदस्यांची पदावनती केली होती.


previous post
next post