Tarun Bharat

सुधारीत… 46 अहवाल निगेटीव्ह, 57प्रतीक्षेत

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातून पाठवण्यात आलेले तब्बल 103 संशयितांचे रिपोर्ट पेंडिंग होते. यातील 46 जणांचे अहवाल निगेटीव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. अद्याप 57 जणांचे अहवाल प्रलंबीत असून त्याकडे लक्ष लागले आहे.

  साखरतर, राजीवडा आणि खेड येथील रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 103 रूग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले होते. यातील 46 जणांचे अहवाल मिळाले असून ते सर्व निगेटीव्ह असल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे बोल्डे यांनी दिली.

 रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात सध्या तीन पॉझिटीव्ह रूग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. 96 रूग्ण रूग्णालयांमध्ये क्वारटाईन आहेत. अद्याप 57 जणांचे अहवाल येणे बाकी असून 24 तासात हे रिपोर्ट मिळतील असेही डॉ. बोल्डे यांनी सागितले. ज्या पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात नागरिक आलेले होते त्यांचे स्वॅब तपासणी पाठवण्यात आले होते, त्यामधील काही जणांचे हे अहवाल प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘होम क्वारंटाईन’ची संख्या 1086    जिल्हय़ात होम क्वारंटाईनची संख्या 1086 असून संस्थात्मक क्वॉरंटाईनची संख्या 274 असल्याची माहिती प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. वाढीव लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सहकार्य देण्याचे आवाहन करतानाच बेजबादार व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस दलाकडून विकसीत ऍपची मदत घेतली जात असल्याचे सांगण्यात आले

Related Stories

रत्नागिरी :भाट्ये किनाऱ्यावर समुद्राच्या उधाणाने मोठे नुकसान

Abhijeet Shinde

रायगड तालुक्यात कार-दुचाकीसह काशीद पूल गेला वाहून

Patil_p

वादळग्रस्त 1 हजार कुटुंबांना अन्नधान्य कीटचे वाटप

Patil_p

कोकण मार्गावर धावली ‘मोदी एक्सप्रेस’

Abhijeet Shinde

खेडमधील 28जणांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p

‘माही’ मुळे मारेकऱयाचा सहा तासांत छडा

Patil_p
error: Content is protected !!