Tarun Bharat

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

काँग्रेस नेते शशी थरूर यांना पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता केल्यानंतर शशी थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले. २०१८ साली दिल्ली पोलिसांनी कोर्टात तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी सुनंदा यांचे पती आणि खासदार शशी थरुर यांच्या नावाचा आरोपीमध्ये समावेश केला होता.

शशी थरुर यांच्यावर पत्नी सुनंदाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. १७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील हॉटेल लीलामधील रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. घटनेच्याच रात्री तपासासाठी या रुमला टाळे ठोकण्यात आले होते.

Related Stories

मुंबईत पुन्हा एकदा होणार 26/11 हल्ल्यासारखा धमाका

Patil_p

मनपाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव ; पराभवाची भीती असल्याचा आशिष शेलारांचा आरोप

Archana Banage

हातकणंगले पोलीस ठाण्यात शिवसैनिकांची चौकशी सुरु

Archana Banage

पश्चिम बंगालमध्ये शाळा-कॉलेज बंद

Patil_p

हिमाचल प्रदेशात ‘आप’ला मोठा झटका

Archana Banage

आश्रिता बनली पहिली महिला फ्लाईट टेस्ट इंजिनियर

Patil_p