Tarun Bharat

सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड टॉरपीडोचे यशस्वी परीक्षण

भारतीय नौदल होणार अधिक मजबूत

वृत्तसंस्था / भुवनेश्वर

Advertisements

भारताने सोमवारी ओडिशाच्या बालासोर किनाऱयावरून दीर्घ पल्ल्याच्या सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड टॉरपीडोचे (स्मार्ट) यशस्वी परीक्षण केले आहे. भारतीय नौदलासाठी डीआरडीओकडून शस्त्रास्त्रप्रणाली विकसित केली जात असल्याची माहिती संरक्षण अधिकाऱयांनी दिली. हे क्षेपणास्त्र टॉरपीडोच्या पारंपरिक सीमेपेक्षा अधिक पटीने पाणबुडीविरोधी युद्धक्षमता वाढविण्यासाठी डिझाइन करण्यात आल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले.

परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्राच्या मारक पल्ल्याच्या पूर्ण क्षमतेचे यशस्वी प्रदर्शन करण्यात आले. डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळांनी या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीसाठी विविध तंत्रज्ञानांचा विकास केला आहे. अधिकाऱयांनुसार या शस्त्रास्त्रप्रणालीला भारतीय नौदलाच्या वापरासाठी विकसित करण्यात आले आहे.

हे परीक्षण डीआरडीओ आणि वायुदलाकडून पोखरण रेंजमधून स्वदेशी स्वरुपात डिझाइन्ड आणि विकसित हेलिकॉप्टर लाँच स्टँड-ऑफ अँटी-टँक (एसएएनटी) क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण परीक्षणाच्या काही दिवसांनी झाले आहे.

11 डिसेंबर रोजी डीआरडीओ आणि वायुदलाने एनएनटी क्षेपणास्त्राच्या उड्डाणाचे यशस्वी परीक्षण केले होते. हे क्षेपणास्त्र 10 किलोमीटरच्या कक्षेतील लक्ष्याचा भेद करू शकते.

Related Stories

मदत हवी असल्यास मला सांगा!

Amit Kulkarni

खराब हवामानामुळे प्रतिदिन ८ जणांचा मृत्यू

Patil_p

अयोध्येत राममंदिर उभारणीच्या कार्याला वेग

datta jadhav

काशी विश्वनाथ मार्गिकेचे आज उद्घाटन

Patil_p

दिल्लीतील कोरोना : दिवसभरात 54 नवे रुग्ण; तर दोघांचा मृत्यू

Rohan_P

कायद्याच्या शिक्षणात तत्काळ सुधारणा घडविण्याची गरज

Patil_p
error: Content is protected !!