Tarun Bharat

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई / ऑनलाईन टीम

अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता अशी रजनीकांत यांची ओळख आहे.दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण ३ मे रोजी होणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या पाच ज्युरींनी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची शिफारस केली होती.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेक्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा सर्व पुरस्कारांची घोषणा विलंबाने झाली. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर चहुबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बहुभाषिक भारतीय अभिनेते

मराठमोळे शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी , कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी द बॉस’ या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.

जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग

रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

Related Stories

वीज बिलात तात्काळ सूट द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

Tousif Mujawar

International Coffee Day 2022 : शरीराला आणि मनाला तरतरी आणणाऱ्या कॉफीचे फाय़दे- तोटे, जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

रामाशिवाय भारत अपूर्ण – उच्च न्यायालय

Patil_p

खर्च कमी करण्यासाठी पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त निवडणूक ‘भाडिपा’ आणणार डिजिटल माध्यमांवर

Patil_p

तेव्हा लोकांनी ढोल वाजवले आता आग नाही लावली म्हणजे झालं : संजय राऊत 

prashant_c