Tarun Bharat

सुपरस्पेशालिटी इस्पितळाचे बांधकाम धिम्यागतीने

Advertisements

कंत्राटदाराला नोटीस देण्याची सूचना : आरोग्य मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

प्रतिनिधी / बेळगाव

सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात मल्टिस्पेशालिटी इस्पितळाचे बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला नोटीस पाठविण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी अधिकाऱयांना केली आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बिम्ससंबंधी डॉ. के. सुधाकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बिम्समधील कारभार सुधारण्यासाठी त्यांनी अधिकाऱयांना अनेक सूचना केल्या आहेत. सुपरस्पेशालिटी इस्पितळासह बिम्सच्या आवारात सुरू असलेले सर्व बांधकाम वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

नागरिकांना परवडेल अशा दरात किंवा मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे सरकारने आरोग्य सुविधांसाठी काही योजना अंमलात आणल्या आहेत. गोरगरिबांना या योजनांचा लाभ व्हावा याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. सध्या कोरोनाचा फैलाव कमी होत चालला आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व विभाग पूर्ण प्रमाणात सुरू करण्याची सूचनाही डॉ. के. सुधाकर यांनी अधिकाऱयांना केली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी नियमितपणे येथील कामकाजाचा आढावा घ्यावा. तालुका इस्पितळांच्या तुलनेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कमी संख्येत प्रसूती का होत आहेत? असा प्रश्न उपस्थित करून बिम्सच्या अधिकाऱयांकडून यासंबंधी खुलासा मागविला आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या सोयी, सुविधा पुरविण्यासंबंधी बिम्सच्या वैद्यकीय संचालकांनी प्रत्येक आठवडय़ात आढावा बैठक घ्यावी. प्रत्येक विभागाला लक्ष्य ठरवून द्यावे, उपचाराचे लक्ष्य गाठण्यास असमर्थ ठरणाऱया विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याची सूचना करण्याबरोबरच सर्व शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर  भरविण्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य खात्याचे संचालक ओमप्रकाश पाटील, जि. पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर संचालक डॉ. आप्पासाहेब नरट्टी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदींसह बिम्स व आरोग्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

देश महासत्ता बनण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक

Patil_p

झेवर गॅलरी अंतिम तर साईराज वॉरियर्स क्वालिफायर फेरीत

Amit Kulkarni

इनाम बडस येथे चोरी करून खत-जनावरांचे खाद्य लांबविले

Patil_p

रविवारी 1331 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

कुत्र्यांच्या हल्ल्यात मेंढ्या ठार कोकरे बेपत्ता

mithun mane

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या जनजागृतीला सुरुवात

Amit Kulkarni
error: Content is protected !!